Breaking News

राजकारण

शिवसेना कुणाची? अजित पवार यांनी सांगितली ‘ती’ माहिती निवडणूक आयोगाची शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या अर्जावर उद्या सुनावणी

जवळपास ६ महिन्यांपासून शिवसेना कोणाची या मुद्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत असून या प्रश्नाचा वाद सध्या केंद्रिय निवडणूक आयोगासमोर आणि सर्वोच्च न्यायालयातही सुरु आहे. त्यातच केंद्रिय निवडणूक आयोगासमोर ३० जानेवारी रोजी या दोन्ही गटांच्या वादावर सुनावणी होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

लिंगायत समाजाच्या मोर्चावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या, ऐकूनच घेत नसल्याने नागरिक रस्त्यावर धर्माला मान्यता द्या मागणीप्रश्नी लिंगायत समाजाचा आझाद मैदानावर मोर्चा

आज मुंबईत भाजपा-शिंदे गटाने आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला. तर दुसऱ्याबाजूवा अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा महामोर्चा काढला. या महामोर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मोर्चाचा इशारा म्हणजे ते …

Read More »

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिंदे गटाकडून हिंदू जनआक्रोश मोर्चा शिवाजी पार्क ते परळच्या कामगार मैदाना दरम्यान काढला मोर्चा

नुकतेच इंडिया टूडे सी व्होटर या कंपनीने जारी केलेल्या सर्व्हेक्षण अहवालात भाजपा-शिंदे गटाच्या जागा कमी होताना दाखवून देत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचे भाकित केले. त्यावरून महाविकास आघाडीच्या गोटात समाधानाचे वातावरण असले तरी भाजपा-शिंदे गटाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी पालिका निवडणूकातील आपल्या हिंदूत्वाचा खुंट्टा …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी एसआयटीमार्फत करा घोटाळेबाज उद्योगपती अदानींची अवस्था ‘सहारा’च्या सुब्रत रॉयसारखी होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे घनिष्ठ संबंध सर्व जगाला माहित आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसीसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सामान्य जनतेचा पैसा मोदींनी आपल्या उद्योगपती मित्राच्या विविध कंपन्यांमध्ये कोणताही विचार न करता गुंतवला. अदानी कंपनीवर केलेल्या मेहरबानीमुळे कोट्यवधी रुपये डुबण्याची भिती निर्माण झाली असून या गैरव्यवहाराची संपूर्ण …

Read More »

शिंदे-फडणवीसांना बच्चू कडू यांचा खोचक टोला, अशीच शांततेनं झोप लागली पाहिजे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर लगावला टोला

राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा रंगताना पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी, विशेषत: महाविकास आघाडीकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार. सध्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा चालू आहे. मुख्यमंत्री आणि …

Read More »

संजय राऊत यांचा शिंदेंना टोला, कल्याण-डोंबिवलीची जागा राखली तरी पुरे… मुख्यमंत्री शिंदेच्या दाव्यावर राऊतांचा टोला

देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे सी-वोटर’चा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला ३४ जागा मिळणार असल्याचं दाखवलं आहे. तर, शिंदे गट आणि भाजपाची पिछेहाट झाल्याचं दिसत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत वाद रंगला आहे. याच संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी …

Read More »

काँग्रेसची टीका, उद्योगपती अदानींवरील पंतप्रधान मोदींच्या प्रेमामुळे अर्थव्यवस्थेसमोर संकट अदानी’मुळे LIC व SBI मधील कोट्यवधी गुतवणुकदारांचे कष्टाचे पैसे धोक्यात !: अतुल लोंढे

अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार हिंडनबर्ग संशोधन संस्थेने उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगवलेला फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समूहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान …

Read More »

इम्तियाज जलिल यांचे आव्हान, भाजपाला मदत करतोय वाटतयं ना, या औवेसींची चर्चा करा महाविकास आघाडी आणि वंचितच्या युतीवर एमआयएमची प्रतिक्रिया

राज्यात एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे. या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची खुली …

Read More »

पवारांच्या टीकेवर प्रकाश आंबेडकर म्हणाले, युती शिवसेनेशी, बाकीच्याशीं देणं घेणं नाही पुढील काळात जसं घडेल त्यावर प्रतिक्रिया देईल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती झाल्यानंतर या युतीमुळे आता महाराष्ट्रामधील राजकीय हालचाली वाढत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे युतीच्या घोषणेनंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपाचेच असल्याचा आरोप केला. …

Read More »

आंबेडकरांच्या मोदींच्या समर्थनावर शरद पवार म्हणाले, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही वंचितशी युतीचा प्रस्ताव आमच्यासमोर नाही

मागील दोन दिवसांपासून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपाशी संबध असल्याचा आरोप केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे समर्थन केले. तसेच सरकारी यंत्रणांच्या गैरवापरावरही मोदींच्या कृत्याचे समर्थन केले. यावरून प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात वादही झाला. यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा …

Read More »