Breaking News

लिंगायत समाजाच्या मोर्चावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या, ऐकूनच घेत नसल्याने नागरिक रस्त्यावर धर्माला मान्यता द्या मागणीप्रश्नी लिंगायत समाजाचा आझाद मैदानावर मोर्चा

आज मुंबईत भाजपा-शिंदे गटाने आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला. तर दुसऱ्याबाजूवा अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा महामोर्चा काढला. या महामोर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मोर्चाचा इशारा म्हणजे ते सरकार विरोधातच असतात. हे असंवेदनशील ईडी सरकार आहे. कुणी ऐकूनच घेत नाही म्हणून लोकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे. मी लिंगायत समाजाचे प्रश्न संसदेत वेळोवेळी मांडत आली आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न हे समजून घेणं आणि त्यावर मार्ग काढणं ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असल्याचे मतही व्यक्त केलं.

लिंगायतला धर्माला संविधानिक मान्यता द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारने धार्मिक अल्पसंख्याक दर्जा जाहिर करावा, विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारावा आदी मागण्या लिंगायत समाज बांधवांकडून करण्यात येत आहेत. मोठ्या संख्यने या महामोर्चात लिंगायत समाज बांधव जमा झालेले आहेत. लेखी आश्वासनाशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
या महामोर्चासाठी सकाळपासून लिंगायत समजाचे बांधव आझाद मैदानावर मोठ्या संख्येने जमा झाले आहेत.

मागील आठवड्यातच लिंगायत समाजाच्या प्रतिनिधींनी या मागण्यांसदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावेळी या मागण्यांबाबत त्यांना सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आली होती. मात्र ठोस आश्वासन मिळालं नव्हतं. त्यामुळे आता लिंगायत समाजाला लेखी आश्वासन हवं आहे किंवा आझाद मैदानावर सरकारकडून शिष्टमंडळ यावं आणि त्यांनी चर्चा करावी अशी समाजबांधवांची मागणी आहे.

आझाद मैदान ते सीएसटी अशी मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र केवळ आझाद मैदानावरच मोर्चासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *