Breaking News

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिंदे गटाकडून हिंदू जनआक्रोश मोर्चा शिवाजी पार्क ते परळच्या कामगार मैदाना दरम्यान काढला मोर्चा

नुकतेच इंडिया टूडे सी व्होटर या कंपनीने जारी केलेल्या सर्व्हेक्षण अहवालात भाजपा-शिंदे गटाच्या जागा कमी होताना दाखवून देत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचे भाकित केले. त्यावरून महाविकास आघाडीच्या गोटात समाधानाचे वातावरण असले तरी भाजपा-शिंदे गटाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी पालिका निवडणूकातील आपल्या हिंदूत्वाचा खुंट्टा हलविण्यासाठी भाजपा-शिंदे गटाने आज मुंबईत लव्ह जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यात लागू करावा या मागणीसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले.

हा मोर्चा शिवाजी पार्क येथून सुरु होऊन परळ येथील कामगार मैदानात त्याचा समारोप करण्यात आला. या मोर्चात भाजपाच्या नेत्यांबरोबर महिला कार्याकर्त्या आणि शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्त्येही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तर, शिवसेनेचे ( ठाकरे गट ) नेते मोर्चात सहभागी झाले नसल्याने भाजपाकडून टीकास्त्र सोडण्यात आलं.

मुंबईतील हिंदू बांधवांची ताकद एकत्र रस्त्यावर उतारावी. तसेच, हिंदू म्हणून एकत्र येत मोर्चातून समाजाल महत्वाचा संदेश द्यावा, या उद्देशाने मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आला आहे. या मोर्चात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतून विविध संप्रदायाचे प्रमुख, हिंदू संघटना सहभागी झाल्या आहेत.

मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले आहेत. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. मोर्च्याच्या प्रत्येक चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. अशा मोर्चात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. त्यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.

दरम्यान, शिवाजी पार्क मैदानातून हा मोर्चा सुरु झाल्यानंतर हा मोर्चा शिवसेना भवनासमोरून जात असताना भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी जो हिंदू हित की बात करेगा वही राज करेगा सारख्या घोषणा ठाकरे गटाला उद्देशून दिल्या जात होत्या. मात्र थोडावेळ थांबून मोर्चा पुढे निघुन गेला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *