Breaking News

इम्तियाज जलिल यांचे आव्हान, भाजपाला मदत करतोय वाटतयं ना, या औवेसींची चर्चा करा महाविकास आघाडी आणि वंचितच्या युतीवर एमआयएमची प्रतिक्रिया

राज्यात एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे. या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची खुली ऑफर देत म्हणाले, आम्ही जर भाजपाला मदत करतो असे वाटत असेल तर मी यापूर्वी दिलेली खुली ऑफर आजही आहे. महाविकास आघाडीने एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत चर्चा करावी असे आवाहन केले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना इम्तियाझ जलिल म्हणाले, मी या आधीही महाविकास आघाडीला ऑफर दिली होती. मुस्लीम समाज म्हणजे आमचीच मालमत्ता आहे, असे अगोदर राजकीय पक्षांना वाटायचे. मुस्लीम समाजाचे मत आमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असा त्यांचा समज होता. अशा परिस्थितीत एमआयएम पक्ष आला आहे. सध्या लोक खूप हुशार झाले आहेत असे विधान केले.

आमच्यामुळे भाजपाला फायदा होतो, असे वाटत असेल तर चला आपण सोबत येऊ. मी याअगोदरही अशी ऑफर दिली आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत बसा. चर्चा करा. तुमच्यामुळे भाजपाला फायदा होत आहे. आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असे त्यांनी आम्हाला सांगावे, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला खुली ऑफर दिली.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *