Breaking News

राजकारण

राज्यपाल आणि तपास यंत्रणांच्या विरोधात देशभरातील नऊ पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा वापर होतोय

भाजपाची सत्ता नसलेल्या आणि भाजपाच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच वर्षभरापासून तपास करून दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. त्यासाठी सुरुवातीला आयकर खात्याकडून नंतर ईडी मार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचा …

Read More »

कपिल सिब्बल यांच्या आवाहनाला उध्दव ठाकरे पाठिंबा देताना म्हणाले… लोकशाही वाचविण्यासाठी स्वतंत्र विचारमंचात सहभागी

२०१४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणित रालोआने विजय मिळवित केंद्रात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून आतापर्यंत राज्यघटनेतील तरतूदींना हरताळ फासत अनेक शासकिय यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घेत विरोधकांना बेमालूमपणे मोडून काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेतील विभाजनावरून आणि निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका याबाबत …

Read More »

ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेला भाजपा-शिंदे गटाकडून आशिर्वाद यात्रेचे प्रत्युत्तर सहा लोकसभा क्षेत्रात होणार आशीर्वाद यात्रा-भाजपा नेते आशिष शेलार

मागील दोन-तीन दिवसांपासून ठाकरे गटाची शिवगर्जना यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे आदी राज्याच्या विविध भागात दौऱ्याच्या निमित्ताने भाजपा, शिंदे गटाच्या विरोधात जाहिर सभा घेत आहेत. यापार्श्वभूमी भाजपा या यात्रेला प्रत्युत्तर म्हणून रविवारपासुन मुंबईत सहा जिल्ह्यात …

Read More »

विधानसभेच्या नोटीसीवर संजय राऊत म्हणाले, हवं तर मला तुरुंगात टाका अजूनही दौऱ्यात आहे घरी पोहोचल्यावर कळेल

शिंदे गटाला उद्देशून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सध्याचे विधिमंडळ हे ४० चोरांचे विधिमंडळ असल्याचे वक्तव्य केल्याने विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्यावतीने संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. तसेच या हक्कभंगाच्या अनुंगाने विधानसभेच्या विशेषाधिकार समितीने राऊत यांना नोटीसही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेच्या …

Read More »

नामांतरावरून खा. इम्तियाज जलील यांचा सवाल, महाराजांनी सांगितले का? शहराला नाव देऊन….. हिमंत असेल तर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी औरंगाबादेतून निवडणूक लढवावी

राज्यातील सत्तांतरापासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराच्या घोषणेला अखेर केंद्र सरकारने मान्यता देत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असं नामांतर करण्यास कोणतीही हरकत नाही, असं पत्र केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवले. त्यानंतर राज्य सरकारने दोन्ही शहरांची नावं बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. आता औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, तर …

Read More »

तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बँनर्जी यांच्या “या” घोषणेने आघाडीला ब्रेक सागर दिघी पोट निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बँनर्जी यांचा एकला चलो चा नारा

कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत देशातील भाजपाच्या हिंदूत्ववादी राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न केला. तसेच भारत जोडो यात्रेला देशातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळल्याने भाजपाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी धर्मनिरपेक्षवादी राजकिय पक्षांकडून आघाडी करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच तृणमुल काँग्रेसच्या …

Read More »

रेल्वे तिकिट बुक करायचंय, मग फक्त बोला बुकिंग झालंच म्हणून समजा आयआरसीटीसीच्या प्रवाशांसाठी लवकरच चॅट बोट

संपूर्ण भारतात मोदी सरकारकडून विविध विकास कामांची घोषणा करण्यात येत आहे. मात्र त्यातील किती कामे मार्गी लागली किती नाही याची विभागवार आकडेवारी कधी तरी समोर येईल. मात्र देशातील भारतीय रेल्वेच्या विकास कामांच्या माध्यमातून विकास कामे सुरु असल्याचा प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारकडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वे प्रवाशांना …

Read More »

अंधारेंच्या टीकेला बच्चु कडूंचे प्रत्युत्तर, आमची स्वतःची पानटपरी..कुठे लावायची ते आम्ही ठरवू आम्ही विकासासाठी गुवाहाटीला गेलो

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार आणि पाठिंबा देणारे १० अपक्ष आमदारही बंडात सहभागी झाले. त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुतच आहे. त्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा पक्ष बांधणीच्या उद्देशाने शिवगर्जना यात्रा सुरु केली असून ही शिवगर्जना यात्रा घेऊन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या अमरावतीत …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली घोषणा

शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, मुंबईतील एआयसीटीईचे कार्यालय दिल्लीला हलवू नका भुजबळांची सभागृहात मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांचे मुंबईतील पश्चिम विभागीय कार्यालय दिल्लीत स्थलांतरित करण्यात येत आहे. याबाबत सूचना पत्र देण्यात आले आहे. या कार्यालयाच्या स्थलांतरामुळे शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एआयसीटीईचे कार्यालय स्थलांतर करण्यात येऊ नये तो निर्णय थांबवावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार तथा राज्याचे …

Read More »