Breaking News

तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बँनर्जी यांच्या “या” घोषणेने आघाडीला ब्रेक सागर दिघी पोट निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बँनर्जी यांचा एकला चलो चा नारा

कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत देशातील भाजपाच्या हिंदूत्ववादी राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न केला. तसेच भारत जोडो यात्रेला देशातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळल्याने भाजपाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी धर्मनिरपेक्षवादी राजकिय पक्षांकडून आघाडी करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी मोठी घोषणा करत बिगर भाजपातेर पक्षाच्या आघाडीलाच अप्रत्यक्ष हादरा दिला. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील एकच खळबळ उडाली आहे.

२०२४च्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला.

पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. सत्तेत असूनही ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे विरोधकांनी त्यावरून टीका करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली.

सागरदिघीमधील पराभवासाठी आपण कुणाला दोष देणार नाही, असं ममता बॅनर्जी म्हणात त्या पुढे म्हणाल्या, कधीकधी लोकशाहीमध्ये विकास हा सकारात्मक किंवा नकारात्मकही असू शकतो. पण या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये एक प्रकारची अनैतिक युती झाली होती. याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. भाजपानं आपली मतं काँग्रेसकडे वळवल्याचं दिसून आलं, असा आरोप केला.

यावेळी पुढे बोलताना ममता बँनर्जी म्हणाल्या, निवडणुकीत प्रत्येकानं जाती-धर्माचं कार्ड वापरलं. भाजपानं अर्थात निवडणुकीला जातीय रंग दिलाच. पण काँग्रेस, माकपनंही मोठ्या प्रमाणावर या प्रकारचं राजकारण केलं. खरंतर भाजपाकडून मदत घेतल्यानंतर आता काँग्रेसनं स्वत:ला भाजपविरोधी म्हणणं बंद करायला हवं, अशा शब्दांत काँग्रेसवर टीका केली.

ममता बॅनर्जींनी पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांतील संभावित आघाडीबाबत मोठी घोषणा करताना म्हणाल्या की, २०२४मध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. आम्ही लोकांच्या पाठिंब्यावर निवडणुका लढवू. माझा विश्वास आहे की ज्यांना भाजपाला पराभूत करायचं आहे, ते नक्कीच तृणमूल काँग्रेसला मतदान करतील, असा विश्वास व्यक्त केला.

एकीकडे भाजपाला पराभूत करण्यासाठी देशपातळीवर विरोधकांची आघाडी उभारण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे विरोधकांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *