Breaking News

रेल्वे तिकिट बुक करायचंय, मग फक्त बोला बुकिंग झालंच म्हणून समजा आयआरसीटीसीच्या प्रवाशांसाठी लवकरच चॅट बोट

संपूर्ण भारतात मोदी सरकारकडून विविध विकास कामांची घोषणा करण्यात येत आहे. मात्र त्यातील किती कामे मार्गी लागली किती नाही याची विभागवार आकडेवारी कधी तरी समोर येईल. मात्र देशातील भारतीय रेल्वेच्या विकास कामांच्या माध्यमातून विकास कामे सुरु असल्याचा प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारकडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वे प्रवाशांना अधिक सुखकर प्रवास करता यावा यासाठी काही दिवसांपूर्वी विना आरक्षित रेल्वे तिकिट जरी काढलेले असले तरी प्रवाशाला आरक्षित डब्ब्यातून प्रवास करता यावा याठी नव्याने तरतूद केल्यानंतर आता आयआरसीटीसी (IRCTC) प्रवाशांसाठी आणखी एक सुविधा आणली जात असून ज्यात तुम्ही बोलताच तुमचं रेल्वे तिकीट बुक होणार आहे.

आयआरटीसी अॅपच्या माध्यमातून तुम्ही तिकीट बुक करत असाल तर आतापर्यंत प्रवाशांना संपूर्ण माहिती भरावी लागत होती. मात्र आता ही सगळी माहिती भरण्याची गरज भासणार नसून मात्र भविष्यात तुम्ही फक्त बोलून सर्व माहिती भरू शकता. यासाठी आयआरसीटीसी नवी सुविधा घेऊन येत आहे. “आस्क दिशा २.०” या नावाने प्रवाशांना ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे.

आयआरसीटीसी सध्या AI वर आधारित आस्क दिशा २.० या नव्या प्लॅटफॉर्मची यशस्वी चाचणी झाली आहे. यामुळे प्रवाशांना आयआरसीटीसीच्या चॅटबॉटमध्ये व्हॉइस कमांड वापरून संपूर्ण ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येणार आहे. यात प्रवासी बोलून सहज आपलं रेल्वे तिकीट बुक करू शकतात. IRCTC च्या या नवीन अपडेटमुळे तिकीट बुक करणे आता सोपे होणार आहे.

आयआरसीटीसीचे म्हणणे आहे की, व्हॉईस कमांडद्वारे तिकीट बुकिंगची चाचणी सुरू यशस्वी झाली आहे. आता प्रवाशांना लवकरच ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. एवढेच नाही तर प्रवाशांना तिकिट रद्द करण्यासह प्रिंट आणि शेअरही ऑप्शन देण्यात येईल. यात प्रवासी ट्रेनशी संबंधित कोणतीही माहिती व्हॉईस कमांडद्वारेच मिळवू शकतात.

आरआयसीटीसीने प्रवाशांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आस्क दिशा नावाचं फिचर तयार केले आहे. या फीचरद्वारे प्रवासी प्रश्न इंग्रजी आणि हिंदीमध्ये विचारू शकतात. याच फिचरमध्ये काही बदल करत व्हॉईस कमांड ऑप्शन अॅड केल जात आहे.

१) तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीच्या आस्क दिशा २.० चॅटबॉटच्या मदतीने तिकीट बुक करता येईल.

२) तिकीट बुकिंगसाठी ग्राहक चॅटबॉटवर टाईप करुन किंवा व्हॉइस कमांड देऊन तिकीट बुक करु शकतात.

३) यात ग्राहकांना तिकीट रद्द करण्यास रद्द केलेले तिकीटांच्या परताव्याची स्थिती देखील तपासता येईल.

४) युजर्स आस्क दिशा २.० प्लॅटफॉर्मवरील चॅटबॉटवरून त्यांच्या पीएनआर स्थितीबाबत चौकशी करु शकतात.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *