Breaking News

१२ वी प्रश्नपत्रिकेतील त्या चुकलेल्या प्रश्नांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना मिळणार ६ गुण राज्य मंडळाच्या बैठकीनंतर सचिव अनुराधा ओक यांची माहिती

नुकत्याच झालेल्या १२ वी परिक्षे दरम्यान इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांच्या ऐवजी मॉडेल उत्तरच छापण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना या चुकीच्या प्रश्नांमुळे मनस्ताप सहन करावा लागला. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकले होते. ही माहिती पुढे आल्यानंतर विषय तज्ज्ञ आणि मुख्य नियामकांच्या संयुक्त सभेत या चुकलेल्या प्रश्नांबाबत चर्चा झाली. संयुक्त सभेच्या अहवालानुसार राज्य मंडळाने निर्णय घेतला असून, पोएट्री विभागातील अन्य कोणतेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असल्यास, त्रुटी असलेल्या ए ३ ते ए ५ या प्रश्नांचे क्रमांक केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास, उत्तरपत्रिकेत पोएट्री विभाग पोएट्री सेक्शन २ असा उल्लेख केला असल्यास प्रत्येक प्रश्नाला दोन या प्रमाणे सहा गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या त्या चुकीच्या उत्तरांबद्दल आत विद्यार्थ्यांना ६ गुण मिळणार आहेत.

मंडळाच्या बैठकीनंतर राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे संयुक्त सभा झाली नव्हती. संयुक्त सभा न झाल्याने इंग्रजीच्या चुकलेल्या प्रश्नांबाबत राज्य मंडळाने निर्णय घेतला नव्हता. अखेर बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर शुक्रवारी संयुक्त सभा झाली. त्यात चुकलेल्या तीन प्रश्नांबाबतच्या सहा गुणांचा निर्णय घेण्यात आला.

संयुक्त सभेच्या अहवालानुसार तीन परिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांना गुण दिले जातील. त्यात पोएट्री विभागातील अन्य कोणतेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असल्यास, त्रुटी असलेल्या ए ३ ते ए ५ या प्रश्नांचे क्रमांक केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास, उत्तरपत्रिकेत पोएट्री विभाग पोएट्री सेक्शन २ असा उल्लेख केला असल्यास प्रत्येक प्रश्नाला दोन या प्रमाणे सहा गुण दिले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *