Breaking News

नामांतरावरून खा. इम्तियाज जलील यांचा सवाल, महाराजांनी सांगितले का? शहराला नाव देऊन….. हिमंत असेल तर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी औरंगाबादेतून निवडणूक लढवावी

राज्यातील सत्तांतरापासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराच्या घोषणेला अखेर केंद्र सरकारने मान्यता देत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असं नामांतर करण्यास कोणतीही हरकत नाही, असं पत्र केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवले. त्यानंतर राज्य सरकारने दोन्ही शहरांची नावं बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. आता औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादला धारशिव, असं ओळखलं जाणार आहे. या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरु केले असून राज्य आणि केंद्र सरकारवरला खोचक सवाल करत टीकास्त्र सोडले.

यावेळी बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, एका शहराचं नाव देऊन मला मोठं करा, असं छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं होतं का? महापुरुषांचा आदर करतो, त्यात दुमत नाही. पण, त्यांचं नाव घेऊन राजकारण सुरु आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगाबादशी काय संबंध आहे? त्यांचा जन्म किंवा मृत्यू येथे झाला होता का? त्यांनी येथे काही काम केलं होतं का? किंवा त्यांचं स्मारक आहे?, असा खोचक सवाल भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला केला.

तसेच पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, तीस वर्षापूर्वी एका पक्षाचे मोठे नेते येथे येऊन म्हणतात, मला या शहराचं नाव संभाजीनगर ठेवायचं आहे. त्यांची भावना विचारात घेऊन हा निर्णय घेतला जातो. तर, मी येथून निवडून आलेला खासदार आहे. ज्या लोकांनी औरंगाबादमध्ये जन्म घेतला आहे, त्यांच्या भावना नाहीत का?, असा सवालही उपस्थित केला.

तुम्हाला औरंगाजेबचा पुळका का? असा सवाल इम्तियाज जलील यांना विचारला असता ते म्हणाले, औरंगाजेबचा जन्मोत्सव किंवा पुण्यतिथी आम्ही साजरी करतो का? ते एक राजा होते. तरीसुद्धा काही लोकं सांगत आहेत, की मी संभाजी महाराजांचा विरोध करत असून, औरंगाजेबचं अनुकरण करतो. मात्र, तसं काही नाही, असे स्पष्टीकरणही दिले.

नामकरण पटलं नसेल राजीनामा द्या, असं मनसेनं म्हटलं आहे. याबद्दल विचारलं असता, जलील म्हणाले, मनसेला जास्त महत्व देत नसल्याने त्यांना उत्तर देणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर पक्षाच्या सर्वेसर्वांना औरंगाबादमधून निवडणूक लढण्यास सांगावं, असे आव्हानही जलील यांनी राज ठाकरेंना दिले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *