Breaking News

Tag Archives: mp

शक्तीप्रदर्शनाच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार यांच्या पाठीशी कोणते आमदार? बहुतांष आमदारांचा अजित पवारांच्या बाजूनं कल

मागील काही महिन्यापासून अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. अखेर त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत २ जुलै रोजी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच अजित …

Read More »

नामांतरावरून खा. इम्तियाज जलील यांचा सवाल, महाराजांनी सांगितले का? शहराला नाव देऊन….. हिमंत असेल तर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी औरंगाबादेतून निवडणूक लढवावी

राज्यातील सत्तांतरापासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराच्या घोषणेला अखेर केंद्र सरकारने मान्यता देत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असं नामांतर करण्यास कोणतीही हरकत नाही, असं पत्र केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवले. त्यानंतर राज्य सरकारने दोन्ही शहरांची नावं बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. आता औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, तर …

Read More »

अरविंद सावंत यांची खोचक टीका, घोषणा ७५ हजाराची आणि नियुक्ती पत्रे दोन हजार

मागील तीन महिन्यात राज्यातून तीन मोठे गुंतवणूकीचे प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून नेले. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील बेरोजगारांना शासकिय नोकरी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यावरून उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

‘सोयाबीन’च्या साठ्यावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस खा. डॉ. अनिल बोंडे यांनी केले मोदी सरकारचे अभिनंदन

केंद्र सरकारने तेलबिया आणि सोयाबीनच्या साठ्यावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. डॉ. अनिल बोंडे यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. डॉ. बोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मोदी सरकारने …

Read More »

श्रीकांत शिंदे म्हणाले, ये तो केवल झाँकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है विरोधकांना सध्या एकनाथ शिंदे स्वप्नातही दिसतात

राज्यात भाजपाच्या पाठिंब्याने शिवसेनेत फुट पाडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. त्यानंतर सत्ताधारी विरूध्द विरोधक अर्थात महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात पहायला मिळत आहे. तसेच हा संघर्ष तीव्र होताना शिवसेना विरुद्ध शिंदे गट, शिवसेना विरुद्ध भाजपा, काँग्रेस विरुद्ध भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असे …

Read More »

खासदार गिरिश बापट यांचा घरचा आहेर; सत्तेसाठी पक्षनिष्ठा, वैचारीक बासनात… भाजपावरच केला वार

सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष प्रवेश दिला जातो. भाजपाही सत्तेची गणिते जुळवित आहे. त्यामुळे निकषही बदलले आहे. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. या सर्व प्रकाराबाबत मी नाराज आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार गिरिश बापट यांनी सध्याच्या …

Read More »

दिव्यांगांसाठी वेगळा विभाग आणि महापोर्टल बंद करा खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करावा आणि महापोर्टल सेवा बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी व महापोर्टल सेवा बंद करण्याबाबत आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांची भेट घेतली. दिव्यांगाच्या …

Read More »

मराठा मोर्चाचे २५ नोव्हेंबरपासून आमदार-खासदाराच्या घरासमोर आंदोलन आबासाहेब पाटील आणइ रमेश केरे-पाटील यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी भाजप सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे कि येत्या १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल परंतु आम्हाला सरकारकडून कोणतीही हालचाल किंवा सकारात्मक कृती दिसत नाही. भाजप सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर आता आमचा विश्वास राहिलेला नाही. आम्हाला जी तोंडी व लेखी आश्वासने …

Read More »