Breaking News

छगन भुजबळ यांची मागणी, मुंबईतील एआयसीटीईचे कार्यालय दिल्लीला हलवू नका भुजबळांची सभागृहात मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांचे मुंबईतील पश्चिम विभागीय कार्यालय दिल्लीत स्थलांतरित करण्यात येत आहे. याबाबत सूचना पत्र देण्यात आले आहे. या कार्यालयाच्या स्थलांतरामुळे शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एआयसीटीईचे कार्यालय स्थलांतर करण्यात येऊ नये तो निर्णय थांबवावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार तथा राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सभागृहात केली.

छगन भुजबळ यांनी आज सभागृहात एआयसीटीईच्या कार्यालयाच्या स्थलांतराबाबत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, एआयसीटीईचे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. विविध तंत्रशिक्षण शिक्षणक्रम, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम एआयसीटीई अंतर्गत येत असतात. अशावेळी प्रवेश क्षमतेपासून अन्य परवांग्यांशी निगडित बाबी या विभागांतर्गत येतात. विभागीय कार्यालय स्थलांतरित करण्यात आले तर विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार असून त्यांच्यात नाराजी पसरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन हा निर्णय मागे घेऊन कार्यालयाचे स्थलांतर थांबविण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी यावेळी सभागृहात केली.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *