Breaking News

कपिल सिब्बल यांच्या आवाहनाला उध्दव ठाकरे पाठिंबा देताना म्हणाले… लोकशाही वाचविण्यासाठी स्वतंत्र विचारमंचात सहभागी

२०१४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणित रालोआने विजय मिळवित केंद्रात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून आतापर्यंत राज्यघटनेतील तरतूदींना हरताळ फासत अनेक शासकिय यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घेत विरोधकांना बेमालूमपणे मोडून काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेतील विभाजनावरून आणि निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका याबाबत देशात संशयाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी पक्षाचे खासदार कपिल सिब्बल यांनी देशातील लोकशाही टिकविण्यासाठी स्वतंत्र विचार मंचाची स्थापना करत त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहननुसार उध्दव ठाकरे यांच्या गटाने सिब्बल यांच्या आवाहनाला पाठिंबा दिला.

यासंदर्भात ठाकरे गटाकडून स्वतंत्र पत्रक काढत कपिल सिब्बल यांच्या आवाहनाला पाठिंबा दिल्याचे जाहिर केले. तसेच लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सगळ्यांनी सिब्बल यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी आज न्याय व्यवस्था आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एक व्यासपीठ उभारण्याचे केलेलं आवाहन स्वागतार्ह असून आपला यास पूर्ण पाठिंबा आहे. देशात लोकशाही जिवंत राहावी अशी ज्यांची इच्छा असेल त्या सगळ्यांनी कपिल सिब्बल याना समर्थन देणे आवश्यक आहे आणि त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी केले.

कपिल सिब्बल हे सध्या उध्दव ठाकरे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडत आहेत. मागील आठवड्यात ठाकरे गटाकडून युक्तीवाद करताना राज्यघटनेतील तरतूदीनुसार शिंदे गटाने पक्ष सोडल्याचे जाहिर केलेले आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर निवडूण आलेल्या व्यक्तीला १० व्या परिशिष्टानुसार दुसऱ्या पक्षात सहभागी व्हावे लागेल किंवा अपात्र ठरावे लागेल. तसेच विधिमंडळातील पक्षनेता आणि प्रतोद नेमण्याचे अधिकार विधिमंडळाबाहेर असलेल्या पक्षाच्या नेत्याला आहेत. विधिमंडळातील पक्षनेत्याला नसल्याचे सांगत लोकशाहीतील परंपरा टीकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे सांगत युक्तीवादा दरम्यानच सिब्बल भावनिक झाल्याचे संपूर्ण भारताने पाहिले. त्यानंतरच कपिल सिब्बल यांनी आज स्वतंत्र व्यासपीठ स्थापन करत असल्याचे जाहिर करत यास पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Check Also

अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांचा युक्तीवाद, घोटाळ्यातील पुरावे मिळाले नाहीत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यातून उद्भवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *