Breaking News

मोहिते-पाटलांच्या भाजप आगमनासाठी पंतप्रधान मोदींची सभा? अकलूजच्या सभेची जोरदार तयारी

मुंबई : प्रतिनिधी
मुलगा रणजितसिंह याच्या पाठोपाठ वडील विजयसिंह मोहिते-पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा संबध राज्यात सुरु आहे. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा अकलूज येथे होत असून या सभेत मोहिते-पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.
येत्या २३ तारखेला माढा मतदार संघात मतदान होणार आहे. माढ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ध्यात सभा झाल्यानंतर आता दुसऱ्यांदा महाराष्ट्रात माढा मतदार संघातील अकलूजला सभा होणार असून भाजपने या सभेची जोरदार तयारी केली आहे . वर्ध्यातल्या सभेकडे अनेकांनी पाट फिरवल्याची चर्चा झाली होती. मात्र अकलूजची रेकॉर्ड ब्रेक करणारी ठरावी यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. माढा मतदार संघात होणारी निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून विद्यमान खासदार विजयसिंह मोहोते पाटील यांचे पुत्र रणजित सिंह मोहिते पाटील यांनीच थेट भाजपात प्रवेश केल्याने या सभेला विशेष महत्व आले आहे . रणजितसिंह मोहिते- पाटील यांना उमेदवारी दिली नसली तरी काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे निंबाळकर यांनाही पंतप्रधान मोदी यांच्या समोर शक्ती प्रदर्शन करायचे आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्तिथीत विजयसिंह मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार की नाही याची चर्चा राज्यभरात आहे . यासंदर्भात भाजप नेते विनोद तावडे यांना विचारणा केली असता तावडे म्हणाले की , रणजितसिंह यांनीच स्पष्ट केले की , विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वादानेच भाजपात प्रवेश करत आहे .त्यामुळे विजयसिंह यांची भूमिका बोलकी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र विजयसिंह यांचा थेट प्रवेश होणार की नाही याबाबत तावडे यांनी स्पष्ट केले नाही .

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, घराणेशाही संपवण्याचा एकदा निर्णय घ्या

तरुणांच्या हाताला काम पाहिजे का ? विभागाचा विकास झाला पाहिजे का ? हे तुम्ही एकदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *