Breaking News

चौथ्या टप्प्यात २८६ पुरूष आणि ३७ महिला उमेदवार १७ लोकसभा मतदारसंघामध्ये ३२३ उमेदवार

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात १७ मतदार संघामध्ये ३२३ उमेदवार राहिले आहेत. यात २८६ पुरूष तर ३७ महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

मतदार संघनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे.

नंदूरबार – ११ उमेदवार (९ पुरूष,२ महिला), धुळे- २८ (२५पुरूष,३ महिला), दिंडोरी-८ (७ पुरूष, १ महिला), नाशिक-१८(१५पुरूष, ३ महिला),पालघर- १२ (११ पुरूष, १ महिला), भिवंडी-१५ (१५पुरूष,० महिला), कल्याण-२८(२५पुरूष, ३ महिला), ठाणे-२३(२१ पुरूष, २ महिला), मुंबई उत्तर-१८(१७ पुरूष, १ महिला), मुंबई उत्तर-पश्चिम-२१ (१९ पुरूष,२ महिला), मुंबई उत्तर पूर्व-२७(२०पुरूष,७ महिला), मुंबई उत्तर-मध्य-२० (१६ पुरूष,४ महिला), मुंबई दक्षिण-मध्य-१७ (१५पुरूष, २ महिला), मुंबई-दक्षिण-१३ (१३ पुरूष, ० महिला), मावळ-२१ (१९ पुरूष, २महिला), शिरुर-२३ (१९ पुरूष, ४ महिला) आणि शिर्डी मतदारसंघात २०(२० पुरूष, ० महिला).

भिवंडी, मुंबई-दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकही महिला उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचे मतदान झाले असून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात एकूण ८६७ उमेदवार आहेत. यामध्ये ७८७ पुरूष उमेदवार तर ८० महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *