Breaking News

त्या टीपण्णीनंतर संजय राऊत यांची टीका, या सरकारची पत काय? बिनकामाचं आणि नपुसंक सरकार मी नाही तर आता न्यायालय आणि जनताही म्हणतेय

मागील काही दिवसात राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत एका विशिष्ट जनसमुदायाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर नुकतीच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार हे नपुंसकासारख वागतंय, वेळेवर पाऊले उचलत नसल्याची टीपण्णी केली. या टीपण्णीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र सरकार हे बिनकामाचं आणि नपुंसक आहे हे मी म्हणत नाही तर न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच जनताही म्हणते आहे. जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं आहे तेव्हापासून या सरकावर टीका करणाऱ्या अनेक उपाध्या लागल्या आहेत. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटलं आहे यावरून या सरकारची पत काय आहे? ते लक्षात येतं असा खोचक टोलाही लगावला.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय महाराष्ट्रात अस्तित्त्वात आहे का? हाच प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस अत्यंत निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करत आहेत. याची कारणं शोधावी लागतील. ती कारणं जाहीरपणे सांगण्यासारखी नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरच निराशा दिसून येते. बुधवारीही संभाजी नगरला जी परिस्थिती निर्माण झाली ही सरकारचं अपयश आहे. महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण व्हावं ही या सरकारची इच्छा आहे. त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करत आहेत, असाही आरोपही केला.

काल विद्वेषयुक्त भाषणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले नसल्याचा आरोप करत महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांच्या प्रशासकीय यंत्रणांविरोधात दाखल अवमान याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. यावरूनही संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला नपुंसक म्हटलं आहे. यापूर्वी न्यायालयाने कधीही कोणत्याही सरकार विरोधात असा शब्द वापरला नाही. आम्ही सातत्याने म्हणतो आहे, की राज्यात सरकारच अस्त्वित्वात नाही. महाराष्ट्रात जातीय तणाव वाढावा, यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *