Breaking News

गजानन किर्तीकरांनी ठाकरेंची मशाल सोडत हाती धरली शिंदेंची ढाल तलवार

मागील अनेक दिवसांपासून उध्दव ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच या अनुषंगाने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही किर्तीकर हे उध्दव ठाकरे गट सोडणार असल्याचे भाकित वर्तविले होते. त्यानुसार आज गजानन किर्तीकर यांनी उध्दव ठाकरे गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे गटाची ढाल-तलवार हाती घेतली. दरम्यान, गजानन किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे समजताच उध्दव ठाकरे गटाने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत गजानन किर्तीकर यांची शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केली.

गजानन किर्तीकर हे उध्दव ठाकरे गटाच्या केंद्रीय कार्यकारणीत होते. मात्र त्यांनी आता तेथून एकनाथ शिंदे गटात आल्याने आता एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांची संख्या समसमान झाली आहे. त्यामुळे आता शिंदे-ठाकरे गटातील निवडणूक आयोगातील लढाई आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या

विचारांवर चालण्यासाठी खासदार गजानन किर्तीकर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश केला. आज मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्यात खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे देखील उपस्थित होते.

आज मुंबईतील दादर माहीम परिसरातील विभाग क्रमांक १० च्या वतीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी एका विशेष मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात जनतेच्या साक्षीने महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्लक सेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे काही आमदार घरवापसी करणार असे दावे केले जात असताना आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन त्यांचे नातू आदित्य ठाकरे खुशाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी गेले असतानाच गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचे काम करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज प्रभादेवी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते आमदार सदा सनवणकर शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ,

तसेच विभाग प्रमुख गिरीश धानुरकर व महिला विभाग संघटिका प्रिया गुरव, शाखाप्रमुख अजय कुसुम, संतोष तेलवणे, अभिजीत राणे, योगेश पाटील, संदीप देवलेकर, मिलिंद तांडेल हे देखील उपस्थित होते.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *