Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या “भावी सहकारी” आणि “डाव्हर्जन” वर मुख्यमंत्र्यांसह कोण काय म्हणाले ? भाजपा मंत्र्याकडे पाहून मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

औरंगाबाद: प्रतिनिधी

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरवातीलाच आपल्या भाषणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व आजी-माजी आणि भावी सहकाऱी असा उल्लेख करत राजकिय वर्तुळात उत्सुकता वाढवत दुसऱ्याच क्षणाला म्हणाले की मला रेल्वे फार आवडते, रेल्वेचे एक बराय त्याला रूळ असतात, त्यामुळे ती इकडे-तिकडे जावू शकत नाही. पण त्याला डायव्हर्जन दिले की आमच्या स्टेशनला गाडी येवू थांबते असे मंचावर उपस्थित असलेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून म्हणाले. त्यावरून शिवसेना पुन्हा एकदा भाजपाबरोबरील युतीचे संकेत देतय की काय अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली.

मात्र दुसऱ्याच मिनिटाला मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याला अप्रत्यक्ष खोडून काढत म्हणाले की, हे खरंय की राजकारणात काहीही घडू शकतं. पण ते कसे आणि काय घडवायचं हे आपल्या हातात असल्याचे स्पष्ट करत आपणच चांगलं आणि वाईट घडवू शकविण्याचे आपल्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे एकाबाजूला मुख्यमंत्र्यांनी भाजपाला हळूवारपणे भावी सहकारी असल्याचे गाजर दाखवित दुसऱ्याबाजूला काय घडवायचं हे आपल्याच हातात असल्याचे सांगत पुन्हा बंद मुठ्ठी सव्वा लाख की असा पवित्रा घेतला. त्यामुळे भाजपाला आगामी निवडणूकीच्या काळात राजकिय भावी साथीदार म्हणून निवडायचे की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याचे सांगत पुन्हा अधांतरी असल्याची बाबही त्यांनी भाजपासह जनतेच्या लक्षात आणून दिली.

भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते काय म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर….वाचा खाली

राजकारणात काहीही घडू शकतं, शिवसेना आणि भाजपा हे समविचारी पक्ष आहेत. मुंबई-नागपूर मेट्रो रेल्वे प्रकरणाच्या निमित्ताने आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.

-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

 

मी काय म्हणालो होतो…४८ तासात बघा काय होते ते. आता तर २४ तास झालेत, तर हे वक्तव्य आले आहे. आणखी वेळ पूर्ण व्हायचा आहे.

-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जे वक्तव्य केले ते त्यांच्या मनातील वक्तव्य केले आहे. त्यामुळे हे घडू शकतं. २०-२५ वर्षे शिवसेना आणि भाजपाची मैत्री होती.

-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

 

मी काय ज्योतिषी आहे काय? उध्दव ठाकरेंच्या मनातलं मी कस सांगणार. भाजपा नेत्यांना आवडलं तर माझ्या आवडण न आवडण्याचा प्रश्न येतो कुठे.

-केंद्रीय मंत्री नारायण राणे

 

मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा मिश्किल विनोद करायची सवय आहे. त्यांनी त्याच पध्दतीने ते वक्तव्य केलं असेल.

-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

 

या पाच वर्षात तर शिवसेना-भाजपा एकत्र येणे कदापी शक्य नाही.

मंत्री छगन भुजबळ

 

मध्यंतरी मुख्यमंत्री म्हणाले होते की, भाजपातील अनेक नेते शिवसेनेत येणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलेलं असावं. कदाचीत रावसाहेब दानवेच शिवसेनेत येणार आहेत.

  • राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील   

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *