Breaking News

छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदी माजी केद्रीय मंत्री विष्णू देव साई यांची निवड राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांना भेटून केला सत्ता स्थापनेचा दावा

छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल ३ डिसंबर रोजी जाहिर झाले. या निवडणूकीत भाजपाकडून मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणवीस याविषयीची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर भाजपाने माजी केंद्रीय मंत्री आणि आदिवासी नेते विष्णू देव साई यांची निवड करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले.

तसेच महाराष्ट्राच्या धर्तीवर छत्तीसगड येथील भाजपा सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु असून उपमुख्यमंत्री पदी ओबीसी समाजातील दोघांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. तसेच माजी मुख्यमंत्री रमणसिंग यांची विधानसभेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

नव्या विधानसभेती भाजपाच्या गटनेते पदी विष्णू देव साई यांची निवड करण्यात आली. त्यानंतर विष्णू देव साई यांनी झारखंडचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांना भेटून सत्ता स्थापनेचे पत्र सादर केले. विशेष म्हणजे यापूर्वी छत्तीसगडसह देशातील प्रत्यक जिल्ह्यात मुख्यमंत्री पदाचा जाहिर करत असतं. परंतु यावेळी भाजपाने निवडणूकीत एकहाती जागा मिळवली असतानाही मुख्यमंत्री पदाची निवड करण्यासाठी भाजपाकडून ८ दिवस घेतले. त्यानंतर आज भाजपाने विश्णू देव साई यांची निवड करण्यात आली

राज्यपाल विश्वभूषण हरिचंद्रन यांच्याकडे सत्ता स्थापनेचे दावा दाखल केल्यानंतर विष्णू देव साई यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले, मोदींची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला दिली आहे. जनतेचा विश्वास मोदींच्या गॅरंटीवर आहे. तर माझा विश्वास मोदी गॅरंटीवर आहे. त्यामुळे सर्वात प्रथम मी मोदी यांनी दिलेल्या गॅरंटीची पूर्तता पूर्ण करण्याचे माझे उद्दिष्ट असल्याचे सांगत राज्यातील आदिवासी समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे हे माझे पहिले लक्ष राहणार आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री पदी निवड केल्यानंतर विष्णू देव साई सरगुजा प्रांतातील असून त्यांच्या प्रांतातून १४ उमेदवार निवडूण आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाणीवपूर्वक आदिवासी समाजाची व्यक्तीची मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली आहे.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *