Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देऊन राम भक्तांना केले मार्गस्थ

जय श्रीराम, सियावर राम चंद्र की जय..च्या जयघोषात आज मीरा भाईंदर येथील रामसेना फाउंडेशनचे ३०० राम भक्त कार्यकर्ते हे मीरा भाईंदर ते अयोध्या हा प्रवास पायी करण्यासाठी आयोध्येकडे मार्गस्थ झाले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने हा पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या ३०० राम भक्तांना शुभेच्छा देताना त्यांचे जागोजागी उत्साहात स्वागत करण्याचे आवाहनही शिवसैनिकाना केले.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वप्न आता पूर्ण होत असून येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असून अभूतपूर्व असा क्षण अनुभवण्यासाठी मीरा भाईंदर ते अयोध्या अशी पदयात्रा ४१ दिवसात पूर्ण करून २१ जानेवारी रोजी हे सारे अयोध्येत पोहोचणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक हिंदूच्या मनातील राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करून दाखवले असून आधी हर घर मोदी हा नारा आता मन मन मोदी असा बदलला असल्याचे आवर्जून नमूद केले. काही जणांनी त्यांच्यावर मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे म्हणत टिका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण अयोध्येत मंदिरही बनले आणि तारीखही ठरली आहे त्यामुळे टीका करणाऱ्यांचे दात घशात घालून दाखवण्याचे काम मोदी यांनी केले असल्याचे सांगितले.

या ३०० राम भक्तांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये याची सर्व खबरदारी घेण्यात आली असून, जागोजागी त्यांची जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जमेल तिथे शिवसैनिकांनीही त्यांचे स्वागत करून त्यांना जमेल तेवढे सहकार्य नक्की करावे असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले. आपण सारे आज अयोध्येला पायी जात असलात तरी २२ जानेवारी रोजी आपल्या सगळ्यांना अयोध्येत नक्की भेटून तुमचे स्वागत करेन असेही शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, विक्रम प्रताप सिंह तसेच शिवसेनेचे मीरा भाईंदर येथील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *