Breaking News

राज्याची महसूली तूट शुन्यावर आणणार आणखी ५-६ वर्षे काम करावे लागणार असल्याची अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या महसूली उत्पन्नात १५ हजार कोटी महसुली तूट येणार असल्याचे जरी स्पष्ट असले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी हा खर्च आहे. त्यामुळे ही तूट येणार असल्याचे सांगत महसुली तूट रकमेत मोजायची नसते. २००९-१० मध्ये महसुली तुटीची टक्केवारी ९४ टक्के होती ती आता ५५ टक्क्यांवर आणली आहे. ही तूट शून्यावर आणणार असून त्यासाठी अर्थसंकल्पाच्या पलिकडे जावून विचार आणि काम करावे लागणार असून या पध्दतीने आणखी पाच-सहा वर्षे काम करावं लागणार असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री मुनगंटीवार बोलत होते. दोन दिवस चाललेल्या या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सर्व सदस्यांनी अर्थसंकल्पावर विचार मांडले.

अन्य राज्यांच्या तुलनेत कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वाढविण्याची आवश्यकता आहे. महसुली खर्च हा वेतन आणि पेन्शन धरलं तरी ४३ टक्के आहे. हा खर्च का जास्त आहे याची माहिती घेत नाही. आपल्या राज्याने सामाजिक बाबतीत जे निर्णय केले. कर्मचार्‍यांच्या संख्या लोकसंख्येच्या तुलनेत महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त असून हा खर्च कमी करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जीएसटीमध्ये कर हा आपल्याकडे ८ लाख १० हजार व्यापारी आता १३, ३०, १६७ व्यापारी जीएसटीच्या कक्षेत आले. महसूल २३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला. राज्याच्या जनतेला पवित्र सभागृहाच्या माध्यमातून आश्वासन देतो की राज्याचं नुकसान होणार नाही. जकात व स्थानिक संस्थांचा कर अव्हरेज ग्रोथ ५.२० टक्के होता. या सरकारने निर्णय करून ८ टक्के ग्रोथ रेट धरून कारवाई केली.

मनरेगा चा खर्च २ हजार ८८ कोटी वाढला. राज्य रोजगार हमी योजना. महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करतो. एखाद्यच्या ठिकाणी सरकार जास्त गंभीर पणे लक्ष रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला रोजगार कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

२००८-०९ तर डेब्ट स्टॉक जास्त होता. तो आपण १६.३ पर्यंत खाली आणला. राज्य कर्जबाजारी आहे असा समज का करता ? असा सवाल करत अर्थसंकल्प तयार करताना राजकिय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वांना पत्रे पाठवली. मात्र त्यापैकी फक्त एका नेत्याचे उत्तर आले. जीएसडीपीचा रेशो विरोधी पक्ष काय म्हणतो हे महत्त्वाचं नाही आकडे काय म्हणतात ते महत्त्वाचं आहे.  रेव्हेन्यू रिसिप्ट पेक्षा रेव्हेन्यू एक्स्पेंडिचर वाढला ०९-१० मध्ये ही टक्केवारी ६४.७२ होती ती ५४.८७ टक्क्यांपर्यंत आणल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज ६.८ हेक्टर बेटावर शिवाजी महाराजांचा २१० मीटर उंचीचा पुतळा याचा समावेश आहे. जो सर्वोच्च स्टॅच्यू आहे. डिझाइन झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढून एल अ‍ॅण्ड टीला ३६०० कोटींचा. ही घोषणा केल्यापासून तीन वर्षं मोजून घ्या. आम्ही त्याचे भूमिपूजन केले. मात्र तुमच्याकडून काहीच झाले नसल्याचा आरोप करत २००३-४ मध्ये शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी  १० कोटींचे तरतूद केली. मात्र एकही रुपया दिला नाही. परंतु राजकारण्यांच्या पिताश्रींच्या सगळा पैसा दिलात आणि त्यांचे स्मारक मात्र त्याच वर्षी पूर्ण केल्याचा आरोपही विरोधकांवर त्यांनी केला.

अर्थसंकल्पाच्या गुलाबी पुस्तकात सविस्तर दिलेल. भयमुक्त, रोजगार युक्त महाराष्ट्र आणि चिंतामुक्त विरोधी पक्ष असा महाराष्ट्र घडविणार असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

भाषणाच्या शेवटी त्यांनी विरोधकांना त्यांनी केलेल्या सर्व आरोपांच्या स्पष्टीकरणाची कागदपत्रे देत यातील चुका दाखविण्याचे आव्हान देत यात जर चुका असल्याचे तुम्ही सिध्द केले. तर याच सभागृहात तुमचे प्रश्न योग्य असल्याचे मी स्वत: सांगेन असे प्रतिपादनही त्यांनी केले.

शिवसेना व भाजप एकत्र निवडणूका लढविणार

राज्यात आगामी निवडणूका शिवसेना व भाजप एकत्रित लढविणार असून कोणी काहीही म्हणो पण राज्यातील जनतेसाठी एकत्रित येणार असल्याचा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही तुमचेच पहा असा उपरोधिक सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *