Breaking News

Tag Archives: finance minister sudhir mungantiwar

दुष्काळग्रस्तांसाठी २२०० कोटी रूपयांची पुरवणी मागण्यात तरतूद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच २० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

मुंबई : प्रतिनिधी यंदाच्या वर्षी राज्यात असमाधानकारक पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भातील २६ जिल्ह्यामधील २५१ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या भागात दुष्काळ जाहीर करावा लागला. या दुष्काळबाधीत शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरिता राज्य सरकारकडून २२०० कोटी रूपयांची पुरवणी मागण्यात तरतूद करण्यात असून यासह २० हजार ३२६.४५ कोटी रूपयांच्या पुरवणी …

Read More »

वाढीव महागाई भत्त्याची ९ महिन्याची थकबाकी ऑक्टोबरच्या वेतनात देणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जानेवारी २०१८ पासून १३९ वरून १४२ इतका करण्यात आला होता. तसेच ऑक्टोबर २०१८ च्या वेतनात या महागाई भत्त्याची रक्कम रोखीने देण्याचे आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आले होते. ९ महिन्याच्या थकबाकीचा निर्णय प्रलंबित होता. मात्र आता तो रोखीने देण्याचा …

Read More »

निवृत्तीवेतन हवय तर ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करा वित्त विभागाच्या लेखाधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय सेवेतून निवृत्त तसेच राज्य शासकीय निवृत्ती/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी दि. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ते ज्या बॅंकेतून निवृत्तीवेतन घेत असतील तिथे हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन वांद्रे येथील वित्त विभागाच्या उपअधिदान व लेखा अधिकारी रश्मी नांदिवडेकर यांनी केले आहे. अधिदान व …

Read More »

आता व्यापाऱ्यांना एकाच राज्यात अनेक दाखले काढता येणार महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी

मुंबईः प्रतिनिधी सद्यस्थितीत व्यापार-धंद्यांसाठी एका राज्यात एकच नोंदणी दाखला घेता येत असे. मात्र जीएसटी नोंदणी दाखल्याच्या तरतूदीत सुधारणा करत व्यापाऱ्यांना आता एकाच राज्यात वेगवेगळ्या व्यापार-धंद्यांसाठी वेगवेगळे नोंदणी दाखले घेता येणे शक्य होणार असून या अदिनियमातील सुधारणेस राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. याबरोबरच मूळ स्त्रोतातून कर गोळा करण्यास (टीडीएस) पात्र …

Read More »

मेक इन इंडिया- मेक इन महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा मंत्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी ‘मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र’ हा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा मंत्र असून यातून सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. स्टेनले स्टिल मर्चंट असोसिएशनच्या ६१ व्या वार्षिक बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी आमदार आशिष शेलार, अतुल शहा …

Read More »

मुंबईसाठी ५० हजार तर मराठवाडा- विदर्भाच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपये द्या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे पंधराव्या वित्त आयोगासमोर तर्काधारित सादरीकरण

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या गरजा आणि राज्याची विकास क्षेत्रे याबाबत पंधराव्या वित्त आयोगासमोर तर्काधारित सादरीकरण करताना राज्याला नियमितस्वरूपात प्राप्त होणाऱ्या तरतुदींव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासासाठी ५० हजार कोटी तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या समतोल सामाजिक- आर्थिक विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांच्या विशेष सहाय्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई …

Read More »

सादरीकरणावरून मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई माहीती व जनसंपर्क आणि अर्थमंत्री कार्यालयाकडून स्वतंत्र दावे

मुंबईः प्रतिनिधी सध्याच्या राज्याच्या आर्थिक स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या वित्त आयोगासमोर आज राज्य सरकार तर्फे आर्थिक परिस्थितीचे चित्र दाखविणाऱ्या गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले. मात्र या सादरकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून श्रेय लाटण्यासाठी परस्पर दावे करण्यात येत आहेत. तसेच वित्त आयोगासमोर करण्यात आलेले सादरीकरण आपणच केल्याचा दावा …

Read More »

वित्त आयोगाकडून राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत आधी चिंता नंतर प्रशस्तीपत्रक राज्याची समाधानकारक प्रगती होत असल्याचा आयोगाला विश्वास

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच दिवसांपूर्वी चिंता व्यक्त करत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचे वित्त आयोगाने आपल्या प्रसिध्दी पत्रकान्वये जाहीर केले. मात्र या दोन दिवसात सरकारने चांगली बडदास्त ठेवताच वित्त आयोगाला उपरती होत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असून प्रगतीपथावर घौडदौड करत असल्याचे प्रमाणपत्र दिले. तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात राज्यापेक्षा राज्याची …

Read More »

विरोधकांच्या टीकेनंतर अर्थमंत्र्यांची सारवासारव सरकार वित्त आय़ोगासमोर बाजू मांडणार असल्याची वित्तमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठविल्यानंतर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सारवा सारव करत अर्थशास्त्राच्या मापदंडानुसार सरकार वेतन देत आहे. कर्जावरील व्याज, निवृत्तीवेतन देत आहोत. या आणि अशाच कितीतरी बाबी आम्ही १५ व्या वित्त आयोगापुढे मांडणार आहोत. त्या मांडल्यानंतर वित्त आयोग आपल्या निष्कर्षाबाबत निश्चितच खुलासा करेल, असा विश्वास त्यांनी …

Read More »

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या राष्ट्रीय आणि जिल्हा सहकारी बँकांवर कारवाईचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी ऐन खरीप हंगामाच्या काळात पीक पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी शेतकऱ्यांकडून बँकाकडे कर्जाची मागणी करण्यात येत आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँका आणि सहा जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांकडून कर्ज देण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी येत असून कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल आणि राज्याच्या सहकार …

Read More »