Breaking News

पुणे कॉस्मोपोलिटीयन शहराचे भाजपा खासदार गिरीश बापट यांनी घेतला अखेरचा श्वास सांस्कृतिक आणि आधुनिक वैचारिकतेशी नातं जोडणारा नेता म्हणून ओळख

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि विद्रोही वैचारिकतेबरोबरच, कर्मठ विचारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि या सगळ्या वैचारीक घुसळीणीशी एकाचवेळी समरस होणारे व अस्सल पुणेरी बाण्याचे भाजपाचे खासदार तथा माजी मंत्री गिरीश बापट यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी आज सकाळी १०.३०च्या सुमारास प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे.

आजचा दिवस अत्यंत वाईट आहे. अत्यंत दु:खद अशी घटना आज घडली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट यांचं निधन झालंय. गेल्या दीड वर्षांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते, आजाराशी झुंजत होते. ते अत्यंत झुंजार असे व्यक्तिमत्व होते. एका योद्ध्याप्रमाणे ते लढले. पण आज त्यांची झुंज थांबली, अशी प्रतिक्रिया जगदीश मुळीक यांनी दिली.

गिरीश बापट मागील दीड वर्षांपासून आजाराशी झुंजत होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र, तरीदेखील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत गिरीश बापट हे एका मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती. इतके आजारी असूनही भाजपाने बापट यांना प्रचारात उतरवल्याचं टीकास्र विरोधकांनी सोडलं होतं.

याच दरम्यान, गिरीश बापट रुग्णालयातून थेट भाजपाच्या एका जनसंपर्क कार्यालयात दाखल झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. गिरीश बापट पुन्हा एकदा राजकारणात पूर्वीप्रमाणेच सक्रीय होणार, अशी चर्चा या घटनेनंतर सुरू झाली होती.

वास्तविक पाहता गिरीश बापट हे कसबा पेठ मतदार संघातून आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर ते येथूनच खासदार म्हणून निवडूण आले. कसबा पेठ हा वास्तविक पाहता पुणे शहरातील कर्मठ हिंदू विचारधारा मानणाऱ्या वर्गांचा भाग म्हणून ओळखला जातो. तर इथेनूच हाकेच्या अंतरावरील भागातून कर्मठ विचारधारेला तिलांजली देणारी विद्रोही चळवळीची केंद्रेही उभा राहिली.

विशेष म्हणजे, भाजपा सारख्या हिंदूत्वावादी विचारसरणीच्या मुशीत तयार झालेल्या गिरिष बापट यांना कधीही भेटलं तर त्यांनी वैयक्तीक संबधात त्या विचारांचा प्रभाव कधी जाणवू दिला नाही. त्यामुळे जरी गिरिश बापट हे भाजपाचे आमदार, खासदार म्हणून निवडूण आलेले होते तरी त्यांचे संबध सर्वपक्षिय विचारधारेच्या नेतृत्वाशी कायम राहिला.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *