Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; स्वातंत्र्यसैनिकांची कंपनी गांधी घराण्याच्या घशात नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडी चौकशीवर फडणवीसांचा खुलासा

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी आज बोलविल्यानंतर संपूर्ण देशभरात काँग्रेसकडून मुंबई आणि नागपूरातील ईडी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. तर दुसऱ्याबाजूला भाजपाकडून देशातील प्रमुख शहरांमध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक घोटाळा कसा झाला याची माहिती देण्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत याप्रकरणात कसा आर्थिक घोटाळा झाला या अनुषंगाने माहिती दिली.

नॅशनल हेराल्ड वर्तमान पत्र ज्या कंपनीच्या मार्फत चालविण्यात येते. ती एजीएल अर्थात असोसिएटेड ग्रुप कंपनी स्वातंत्रपूर्व काळात ५ हजार स्वातंत्र्यसैनिकांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली यंग इडिया वर्तमान पत्रासाठी स्थापन केली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर २०१० साली राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने यंग इंडिया नावाने केवळ पाच लाखात नवी कंपनी तयार केली. आणि एजीएलच्या नावे असलेली दोन हजार कोटींची मालमत्ता या कंपनीच्या नावे करत स्वतःच्या घशात घालण्यात आल्याचा गंभीर आरोप राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विरोधी पक्ष नेत्याासाठी असलेल्या सागर शासकिय बंगल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांच्यासोबत प्रविण दरेकर, प्रसाद लाड हे ही उपस्थित होते.
वास्तविक पाहता एजीएल कंपनी ही स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केलेली आहे. त्यामुळे ही कंपनी राष्ट्राची संपत्ती आहे. मात्र ती एका खाजगी कंपनीच्या नावावर करण्यात आली. तसेच गांधी कुटुंबियांच्या मालकीच्या कंपनीत हस्तांतरीत करण्यात आली. त्यामुळेच दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणात भष्ट्राचार झाल्याचा सरळ सरळ निकाल दिलेला आहे. त्यानंतर ईडीने कारवाई सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
पाच हजार स्वातंत्र्यसैनिकांनी ही कंपनी १८३० साली स्थापन केली. त्यामुळे ती देशाची संपत्ती होते. या कंपनीची स्थापना करण्या मागे केवळ स्वातंत्र्य चळवळीचे मुखपत्र असावे यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्लीत काही ठिकाणी मै राहुल गांधी हूँ, सावरकर नही, माफी नही मागुंगा अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी तुरुंगवास भोगला आहे. तर तुम्ही भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची तुलना सावरकरांशी होवू शकत नाही.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *