Breaking News

राज्य सरकारच्या आवाहनाला भाजपाचा प्रतिसाद भाजपातर्फे सेवाकार्य अभियानातंर्गत १ लाख २५ हजार कार्यकर्त्ये कामाला

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्यावर आलेल्या कोरोना आजार संकटाच्या मुकाबल्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षांनी एकजूट दाखवित एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. या आवाहनाला प्रदेश भाजपाने सकारात्मक प्रतिसाद असून राज्यातील गरजू लोकांना जेवण, त्यांना दैनंदिन वस्तुंचा पुरवठा, रक्तदान शिबीरे आदी गोष्टींसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी मुकाबला करण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर गरजूंना जेवणकम्युनिटी किचनगरजुंना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा आणि रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. या सेवा कार्यात राज्यभरातील १ लाख २५ हजार कार्यकर्ते सहभागी झाल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राज्यभरातील सुमारे ६०० मंडलांमध्ये सेवा कार्य सुरू झाले असून ३०० ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू झाली आहेत. त्याचा लाभ हजारो गरजू घेत आहेत. लातूरसाताराजळगाव आदी १० जिल्ह्यांमध्ये रक्तदानाचे काम सुरू झाले आहे. सुमारे एक हजार खेड्यांमध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधक फवारणीचे काम करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी अन्न आणि औषध पुरवठा करण्यासोबतच शेतकऱ्यांना बियाणे आणि खते सुद्धा घरोघरी देण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

या खेरीज नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे. सद्य स्थितीत कोणीही उपाशी राहू नये यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था पक्षातर्फे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पदाधिकारीआमदारखासदारमहापौरजिल्हापरिषद अध्यक्षमंडल आणि बूथ कार्यकर्तेजिल्हाध्यक्ष यांच्याशी एकूण ५ संवादसेतूच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात सुरू झालेल्या विविध सेवाकार्याचा नुकताच आढावा घेतला. राज्यभरातील शक्ती केंद्र प्रमुखांना आणि १३ हजार राज्य परिषद पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकां पाटीलमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्य प्रभारी खा. सरोज पांडेराष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीशप्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिकसुधीर मुनगंटीवारविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरमुंबई अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा आदींनी संवादसेतूच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *