Breaking News

अजित पवार म्हणतात दिलेला शब्द फिरविणाऱ्यातला मी नाही भाजप आमदार शेलारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी

मी माझ्या जीवनात एकदा दिलेला शब्द कधीही फिरवित नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्याबाबत मी मांडलेली भूमिका कालही तीच होती आजचही तीच आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर हे आरक्षण न्यायालयात टिकणारे हवे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने काय अहवाल दिला? याची माहिती सभागृहाला मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत हा मराठा समाजाबरोबरच धनगर समाजासंबधीचा अहवाल सभागृहात मांडल्याशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला दिला.

विधानसभेत मराठा, धनगर समाजाच्या प्रश्नावरून रणकंदन सुरु असताना भाजपचे आमदार अँड. आशिष शेलार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेत बदल ३६० अंशाचा बदल झाला असून ते घुमजाव करत आहेत. याची माहिती सदनाला मिळणे आवश्यक असल्याचे सांगत परवा पवार बोलताना म्हणाले होते की हा अहवाल सभागृहात मांडण्याऐवजी तो गटनेत्यांच्या बैठकीत मांडावा. मग ते आज अहवाल सभागृहात का मांडा म्हणत आहेत? असा सवाल उपस्थित केला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी वरील खुलासा केला.

सरकार रोज नवीन नवीन वक्तव्य करत आहे.मुख्यमंत्री वेगळं वक्तव्य करतात. हायकोर्टात वेगळं सागितलं जातं. सकाळी अटर्नी जनरल हायकोर्टाला वेगळं सांगतात तर दुपारी प्रख्यात सरकारी वकील सरकारच्यावतीने वेगळं सांगितलं जातं आहे. तर दुसरीकडे विनोद तावडे,चंद्रकांतदादा पाटील वेगळं सांगत आहेत. त्यामुळे जनतेला या सरकारचं काय चाललं आहे हे कळेना झालं आहे. या सरकारचा आरक्षणावर वेळकाढूपणा सुरु आहे. सरकार चर्चा करावयाच्याऐवजी पळ काढण्याचे काम करत आहे. सभागृहाच्या कामकाजाचे दिवस कमी करत आहे आणि आम्ही जे मुद्दे सभागृहात मांडत आहोत त्याच्याबद्दल स्पष्ट भूमिका सरकार देत नाही असा आरोप अजितदादा पवार यांनी केला.

आज शेतमजुर आणि आदिवासी आणि त्यांच्या महिला मुलंबाळं घेवून मोर्चात आल्या आहेत. त्यांनादेखील आठ महिन्यापूर्वी दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही म्हणून हा समाज आज इथे मोर्चा घेवून आला आहे. सरकार कितीदिवस चालढकल करणार आहे असा संतप्त सवाल अजितदादांनी सरकारला केला.

दुष्काळाबाबत सरकारची ठोस भूमिका नाही. ३१ ऑक्टोबरला सरकारने दुष्काळाबाबत भूमिका जाहीर केली परंतु आज तीन आठवडे होवून गेले. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्याला कुठलीही मदत सरकारने दिलेली नाही अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यांच्या विधवा पत्नी आज मागण्या घेवून आल्या आहेत. त्यांना इथपर्यंत यावं लागतं आहे. सरकार त्याचंही ऐकायला तयार नाही. म्हणजे हे मुठभर लोकांच्यासाठी चाललेले सरकार आहे का असा संतप्त सवालही अजितदादा यांनी केला.

या सगळया गोष्टींसाठी सभागृहाचे कामकाज होवू न देण्याची आम्ही स्पष्ट भूमिका घेतली आहे. आज या सरकारने काम रेटून नेताना गोंधळामध्ये काही बीले मंजुर करुन घेतली आहेत. सरकार गोंधळात बिले मंजुर करुन घेत आहेत आणि जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही मांडत आहोत त्या प्रश्नांना उत्तर हे सरकार देत नाही असा आरोपही अजितदादा यांनी केला.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *