Breaking News

मुख्यमंत्री शिंदेबरोबर गेलेल्या बच्चू कडू आणि नाणार संदर्भात देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य बच्चू कडू मी फोनवर सांगितल्यानंतर ते शिंदेसोबत गेले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित शिवसेनेतील ४० आमदारांबरोबरच शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या १० अपक्ष आमदारांनाही सोबत नेले. यात बच्चू कडू यांचाही समावेश होता. मात्र बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कसे गेले याची माहितीच देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. त्याचबरोबर नियोजित नाणार प्रकल्पाबाबतही महत्वाचे विधान केले.

मागील काही दिवसात राज्यातील जवळपास तीन उद्योग बाहेर गेले. यातील वेदांता-फॉक्सकॉन दोन उद्योग गुजरातला तर सॅफ्रन हा उद्योग हैद्राबादला गेला. यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत होती. तसेच रोज नव नवी माहिती बाहेर आणली जात होती. यापार्श्वभूमीव शिंदे-फडणवीस सरकारचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यास प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सामंत हे विरोधकांना प्रत्युत्तर देण्यात कमी पडत होते. त्यामुळे अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना मागील काही दिवसांपासून अमरावतीचे भाजपा समर्थक आमदार रवी राणा आणि एकनाथ शिंदे समर्थक तथा प्रहार संघटनेचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात कलगी तुरा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर बच्चू कडू-रवी राणा यांच्या वादावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बच्चू कडू हे मी त्यांना फोन करून सांगितल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यांच्या जाण्यामागे आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर बहुमत सिध्द करताना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आमदारांची संख्या कमी पडू नये यासाठी बच्चू कडू यांना मुख्यमंत्री शिंदे सोबत जाण्यासाठी फोन केला आणि माझ्या सांगण्यावरूनच ते गेले असे सांगितले.

तसेच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात जो वाद निर्माण झाला त्या वादातूनही चुकिची वक्तव्ये करण्यात आली. मात्र आता हा वाद शांत संपला आहे. त्यात काही विशेष आता शिल्लक राहिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर गुंतवणूकीचा बाप असलेला रिफायनरी प्रकल्प कोणाचा कितीही विरोध असला तरी आम्ही तो करणारच असे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुंतवणूकीचा बाप हा शब्दप्रयोग मी जाणीवपूर्वक केला. कारण या प्रकल्पातून ३ लाख कोटी रूपयांची राज्यात होणार आहे. यात ७५ टक्के निधी आणि कंपन्या या केंद्र सरकारच्या आहेत. त्या प्रकल्पाच्या प्रस्तावित जमिनीच्या यादीतून आम्ही नाणारला वगळले आहे. तो प्रकल्प आम्ही इतर ठिकाणच्या जमिनीवर करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *