Breaking News

उत्पन्न वाढीच्या मुद्यावरून जयंत पाटील हसन मुश्रीफ यांच्यात रंगला वाद पहिल्यादाच राष्ट्रवादीच्या दोन गटातील मंत्र्यांमध्ये रंगला वाद

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सत्ताधारी गटासोबत गेलेल्या अजित पवार यांच्यासह ९ आमदार मंत्र्यांमध्ये आणि शरद पवार यांच्या गटात आतापर्यंत एखाद्या प्रश्नावरून वाद रंगल्याचे चित्र सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात दिसले नव्हते. मात्र आज पहिल्यांदाच अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे आमदारा जयंत पाटील यांच्यात लक्षवेधीवरील चर्चे दरम्यान चांगलाच वाद रंगल्याचे दिसले. दरम्यान, शरद पवार समर्थक म्हणून ओळखले जाणारे हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांची साथ दिल्याची एक किनार या वादाला असल्याची चर्चा विधिमंडळ सभागृहात व्यक्त केली.

हसन मुश्रीफ म्हणाले संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची मर्यादा २१ हजारांवरुन ५१ हजार रुपये करावी, अशी मागणी असल्याचं म्हटलं. ज्येष्ठ नागरिकांचं वय ६५ वरुन ६० करावं, अशी मागणी आहे ती टप्प्या टप्प्यानं शासन करेल, असं उत्तर दिलं.

हसन मुश्रीफ यांची खासगीत उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपये करावी अशी भूमिका होती. त्यांची भूमिका टप्प्या टप्प्यानं बदत गेली आहे, असं जयंत पाटील म्हणाले. आज रुपयाचे अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झाले आहे. २१ हजारांची किंमत आज जवळपास ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत झाले आहे, याचा विचार करून ही मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

गरीब वंचित घटकांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळावा यासाठी उत्पन्न मर्यादा २१ हजारहून ५० हजारपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी आज लक्षवेधी सुचने दरम्यान केली. आज रुपयाचे अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झाले आहे. २१ हजारांची किंमत आज जवळपास ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत…

हसन मुश्रीफ यांनी यावर बोलताना सध्या ४१ लाख लाभार्थी आहेत. साडे सात हजार कोटी शासन खर्च करतंय उत्पन्न वाढवलं तर दुप्पट खर्च होईल, त्यामुळं टप्प्या टप्प्यानं निर्णय घेण्यात येईल असं म्हटलं. यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावर हसन मुश्रीफ यांनी काय उत्तर द्यावं, अशी भूमिका घेतली.

जयंत पाटील यांनी घेत आमदारांना ५० कोटी, १०० कोटी, ५०० कोटी रुपये निधीच्या माध्यमातून वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मग गरीब जनतेसाठी हे सरकार आखडते हात का घेते ? हे सरकार गरीबांचे नसून धनिकांचे आहे हे यातून सिद्व होते, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

तसेच आमदारांना निधी देताना पैसे कमी पडत नाही, गोर गरिबांची उत्पन्न मर्यादा वाढवण्याच्या वेळी निधी कमी असं सांगतात. अर्थमंत्री तुमच्याच विचाराचे आहेत, असा खोचक टोलाही जयंत पाटील लगावला.
यानंतर हसन मुश्रीफ यांनी २१ हजार रुपयांची उत्पन्न मर्यादा ५० हजार करावी, हा प्रस्ताव मंत्रिमंडळात लवकरात लवकर नेऊ, असं म्हणून विषय संपवण्याचा प्रयत्न केला.

यानंतर गरीब वंचित घटकांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळावा यासाठी उत्पन्न मर्यादा २१ हजारहून ५० हजारपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी आज लक्षवेधी सुचनेदरम्यान केली.
दरम्यान, सोलापूरातील सेतू कार्यालय सध्या बंद अवस्थेत असल्याने त्याचा परिणाम परिणाम नागरिकांवर होत असल्याबाबतची मुद्दा लक्ष्यवेधी सूचनेच्या माध्यमातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला होता.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *