Breaking News

शस्त्रक्रियेनंतर शरद पवार फिट अँड फाईन: कामकाजाला केली सुरुवात आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा द्यावा ;शरद पवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी

पोटदुखी व तोंडातील वाढलेल्या अल्सरच्या शस्त्रक्रियेनंतर काही दिवस आराम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण फिट अँड फाईन असल्याचा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर आणि विरोधकांना देण्यासाठी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज पत्र लिहीत आपल्या कामकाजाचा पुनच्च: हरी होम केला. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत मुंबईतील काही ठिकाणांना भेटी देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मुंबईतील काही ठिकाणांना भेटी दिल्याचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मिडियावरून प्रसारीत केला आहे. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहीत राज्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अडीअडचणीकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.

आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्यादृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केला.

कोविड-१९ ह्या जागतिक महामारीच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे असेही शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत शरद पवार यांची भेट घेत त्यांना अवगत केले.

Check Also

राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published.