Breaking News

आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला, … मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवतील मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर बोलताना युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपासह राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले , राज्यातील मिंदे यांच्या नेतृत्वाखालील फडणवीस-पवार यांचे सरकार हे तोडून मोडून हे सरकार बनलं आहे. आम्हाला वाटलं हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल. मात्र या सरकारला आमच्यापेक्षा जास्त काळजी गुजरातची लागली आहे. राज्यातून वेदांता-फॉक्सकॉन बल्कड्रग पार्क, अगदी वर्ल्ड कप ची फायनल सुद्धा त्यांनी गुजरातला नेली असा आरोप करत आता हिरे बाजार सुद्धा गुजरातला नेला असा गौप्यस्फोट करत हे काय होते कोणाच्या आदेशाने होते हे सगळ्यांना माहिती आहे असा अंगुलीनिर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केला.

तसेच पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आता हे सगळं बुलेट ट्रेन येण्याआधी झालेलं आहे. बुलेट ट्रेन काम पूर्ण झाल्यानंतर या सरकारला मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवाव असं वाटेल असा उपरोधिक टोलाही भाजपाला लगावला.

शिवसेना नेते,युवासेना अध्यक्ष,आमदार आदित्य ठाकरे यांनी डिलाई रोड पूलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी घटनाबाह्य सरकारवर हल्लाबोल चढवत.

भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले,
जे बीसीसीआय मध्ये बसून मुंबईतली फायनल गुजरातला नेऊ शकतात ते यावर उत्तर देण्याच्या लायकीची आहेत असं मला वाटत नाही असा टोलाही शेलार यांचे नाव न घेता केला. ज्यांना फर्स्टस्ट्रेशन येते ज्यांना थेरपीची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही. ज्यांना पक्षात किंमत नाही त्यांना मी उत्तर देत नाही अशी उपरोधिक टीकाही केली.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, सिनेट निवडणूक निर्णयावरून हे स्पष्ट झालं आहे की हे सरकार घाबरट आहे. आमच्या ताकदीला हे सरकार घाबरत आहे. मागच्या वेळेच्या पदवीधर निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी विजयी झाल्याची आठवणही यावेळी करून दिली.

या युनिटच्या दहा जागांवर सुद्धा आम्ही जिंकणार होतो हे त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे या निवडणुका पुढे नेल्या जातायत असा आरोप करत भाजपाच्या कार्यकर्त्यांना मला प्रश्न आहे ज्यांनी आंदोलन केली जे पक्षासाठी काम करत आहे. त्यांनी विचार केला पाहिजे की कॅबिनेटमध्ये ३० पैकी फक्त सहा मंत्री हे मूळ भाजपाचे आहेत. महामंडळ कुठेही कोणाला दिली गेली नाहीयेत. पुणे पालकमंत्री सुद्धा दुसरीकडे गेलेले आहे . त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना नेमकं मिळालं काय ?
त्यामुळे सगळ्यात भ्रष्ट कारभार या सरकारला झालेला आहे असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षण प्रश्नी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा ? आमच्यापासून ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांचा त्यांनी विश्वासघात केलाय. एहसान फरामोश लोकांवर आपण किती विश्वास ठेवायचा ? असा सवाल करत मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यावर थेट बोलण्याचे टाळले.
तिघांमधला जनरल डायर कोण ? याचे उत्तर अजूनही मिळालं नाही. मुनगंटीवार दहा दिवस टूरवर होते असं कळलं तिथून त्यांना काय काय कळलं ? असा उपरोधिक टोलाही सुधीर मुनगंटावार यांना लगावला.

डिलाइ रोडचं नाव आम्ही डीले रोड करणार होतो. गणपती आगमना दिवशी आम्ही एक बाजू या पुलाची सुरू केली होती. १० नोव्हेंबर पर्यंत दुसरी बाजू सुद्धा पूर्ण होऊन सुरू केली जाईल अशी अपेक्षा आहे. गोखले पूल का पाडला गेला हा राजकीय स्टंट होता का ? एवढी घाई तो पूल पाडण्यासाठी का केली ? जशी या ब्रिजसाठी रेल्वेने दिरंगाई केली, तशीच आता त्या पुलासाठी सुद्धा रेल्वे हातबल झाल्याचा दाखवत आहे. गोखले पुलाचे काम वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीये रेल्वे कडून सहकार्य मिळत नसल्याची माहिती असल्याचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिकेच्या या साइट्सवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाहीत ते फक्त दिल्लीत पळत असतात. या सरकारला मुंबईची महाराष्ट्राची काळजी नाही असा आरोप करत त्यांना दिल्ली आणि गुजरातची काळजी दिसते अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *