Breaking News

बीसीसीआयने आयपीएल २०२४ च्या लिलावासंदर्भात दिली महत्वपूर्ण माहिती आयपीएल २०२४ च्या क्रिकेट सामन्यासाठी या देशात लागणार खेळाडूंची बोली

भारतात सध्या वनडे वर्ल्डकपचा फिव्हर जोर धरू लागला असून क्रिकेट चाहते त्यांचा आनंद घेत आहे. यादरम्यान, बीसीसीआयने अजून एक मोठी घोषणा करत भारतातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएल २०२४ कडे देखील वेधले. बीसीसीआयने फ्रेंचायजींना त्यांचे रिलीज आणि रिटेन खेळाडू कोण कोण असतील याची यादी १५ नोव्हेंबर पर्यंत जमा करण्यास सांगितले आहे.

आयपीएल २०२४ साठी ट्रेडिंग विंडो ओपन आहे. मात्र वर्ल्डकप सुरू असल्याने तेथे फार हालचाली होताना दिसत नाहीये. आयपीएल २०२४ लिलाव हा एका दिवसात संपणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव हा विदेशात देखील होण्याची शक्यता आहे. हा लिलाव १९ डिसेंबरला दुबईत होण्याची शक्यता आहे. आयपीएलचा मेगा लिलाव हा २०२४ ला डिसेंबर महिन्यात होणार आहे.

यंदाचा लिलाव जरी मिनी लिलाव असला तरी खेळाडूंना किती पैसे मिळतील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. संघांची पर्स आता वाढवली आहे. प्रत्येक संघाच्या पर्समध्ये ५ कोटी रूपयांची वाढ होऊन ती १०० कोटी झाली आहे. आता या बोलीकडे सर्वच फ्रेंचायजीचे लक्ष लागले असून दुबईमध्ये रंगणाऱ्या लिलावामध्ये कोणत्या खेळाडूसाठी कास्ट बोली लागले हे पाहावे लागणार आहे.

Check Also

अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”

‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *