Breaking News

चीनी हॅकर्स झटपट कर्जाचं आमिष दाखवून लोकांचे पैसे घेऊन होतायत गायब   झटपट कर्जाच्या आमिषाला पडू नका बळी; अन्यथा खाते होईल रिकामं

झटपट कर्जाच्या अमिषाला भारतीय नागरिक बळी पडून चीनी लोन स्कॅममध्ये अडकून अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अशा बनावट कर्ज एप्सवर अनेकदा बंदी घालण्यात आली आहे, परंतु त्यांची नावे बदलल्यानंतर ते परत येतात. सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सने वॉर्निंग दिली आहे की, चीनी घोटाळेबाज सामान्य भारतीय लोकांना अडकवण्यासाठी बेकायदेशीर इन्स्टंट लोन एप्स वापरत आहेत.

एका प्रसिद्ध न्युज पेपरच्या रिपोर्टनुसार, हे स्कॅमर्स बेकायदेशीर लोन एप्स वापरत आहेत. लोकांना फसवण्यासाठी ते पुरेसे कर्ज आणि सहज परतफेडीची खोटी आश्वासने देतात. लोकांचे वैयक्तिक तपशील आणि फी घेऊन हे स्कॅमर्स गायब होत आहेत. रिपोर्टमध्ये असे ५५ अँड्रॉइड एप्स वेगवेगळ्या माध्यमातून समोर आले आहेत. संशोधकांनी सांगितलं की, अशा फसवणूक योजना चालवणारे १५ पेमेंट गेटवे चीनमधून चालवले जात आहेत.

केवळ भारतातच नाही तर इतर देशांतील लोकांची फसवणूक करण्यासाठी चीनी व्यक्ती या बनावट पेमेंट गेटवेचा वापर करत आहेत. इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण आफ्रीका, मेक्सिको, ब्राझील, तुर्की, व्हिएतनाम, फिलीपाईन्स आणि कोलंबिया यांसारख्या देशांमध्येही त्यांचे नेटवर्क पसरलेले आहे. त्यामुळे यापासून सावधान राहण्याच्या सूचना सायबर पोलिसांनी जनतेला दिल्या आहेत.

नेमकी फसवणूक कशी करतात

चीनी हॅकर्स लोकांना फसवण्यासाठी लोन एप्स तयार करतात. या बेकायदेशीर एप्सचा सोशल मीडियाच्या माध्यमातूनप्रचार केला जातो. जेव्हा एखादा युजर हे एप डाउनलोड करतो तेव्हा ते त्याचे वैयक्तिक तपशील चोरतात आणि प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे घेतात. हे हॅकर्स पैसे दिल्यानंतर गायब होतात.

या गोष्टी नेहमी ठेवा लक्षात

स्कॅमर्स सामान्य लोकांना लक्ष्य करतात ज्यांना कर्जाबद्दल फारशी माहिती नसते. साधारणपणे या लोकांना छोट्या कर्जाची गरज असते. अशा परिस्थितीत, तुम्ही अनोळखी इन्स्टंट लोन देणार्‍या एप्सबाबत सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. कर्ज देण्याच्या नावाखाली हे अएप्स तुमचे कॉन्टॅक्ट, फोटो आणि व्हिडिओ अशी वैयक्तिक माहिती चोरतात. त्यानंतर ते युजर्सना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतात. कर्ज घेण्यासाठी तुम्ही नेहमी विश्वसनीय सोर्स वापरावा.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *