Breaking News

पंतप्रधानांसोबतच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्यानंतरच राज्यपाल कोश्यारी पदमुक्त फक्त स्वागत आणि निरोपाला हजर रहात आपली नाराजी पहिल्यांदाच दाखविली

काही दिवसांपूर्वी राज्याच्या राज्यपाल पदावरून मुक्त करण्यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्यानंतरही पंतप्रधानांनी त्यांच्या इच्छेनुसार पदमुक्त केले नसल्याने वीस दिवसाच्या अंतराने मुंबईत दुसऱ्यांदा आलेल्या पंतप्रधान मोदीसोबत कार्यक्रमाला हजर राहण्यास असमर्थता दाखवित पहिल्यांदाच आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यानंतर लगेच एक दिवसाच्या अंतराने केंद्र सरकारने भगतसिंग कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे पाठवित मंजूर केला. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी धुरा छत्तीसगडचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे सोपवित त्यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली. यासंदर्भातील सर्वात आधी वृत्त मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाने गुरूवारी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्वप्रथम प्रसिध्द केले होते.

मागील आठवड्यात शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला हिरवा कंदील दाखविण्यासाठी आले होते. त्याच्या एकदिवस आधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या इच्छेनुसार पद मुक्त केले नसल्याने आपण पंतप्रधानासोबतच्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरविण्याचा निर्णय घेतला. फक्त राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी आणि निरोपावेळी हजर राहणार असल्याचे प्रशासनाला कळविले.त्यासाठी कोश्यारी यांनी आजारी असल्याचे कारणही पुढे केले.

हे ही वाचाः-

उद्या पंतप्रधान मोदींचा दौरा, पण नाराज राज्यपाल कोश्यारींची कार्यक्रमाकडे पाठ

मात्र राज्यपाल कोश्यारी हे एकाबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील मुंबईतील एकाही कार्यक्रमाला उपस्थित राहीले नाहीत. मात्र त्यांनी मुंबईतच विद्यापाठाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित रहात पूर्णवेळ थांबले. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या कृतीतून पंतप्रधानांच्या वेळ काढूपणाबद्दल तीव्र नाराजी असल्याचे दाखवून दिले.

त्यामुळे काल शनिवारी आणि रविवारचा दिवस प्रशासकिय सुटीचे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करत तशी शिफारस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना केली. त्यानुसार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करत पदमुक्त केले आणि महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी रमेश बैस यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे जाहिर केले.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *