Breaking News

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांनी केला एकत्र प्रवास, दिले हे कारण नाशिकमधील भाजपा प्रदेश कार्यक्रमाच्या निमित्ताने केला प्रवास

अलीकडच्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंनी गैरहजरी लावली होती. अशातच आज ११ फेब्रुवारी रोजी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांनी एका कारमधून प्रवास केला. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

भाजपाची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरु झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, भाजपाचे प्रदेश पदाधिकारी संबोधित करणार आहेत. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच कारने आले होते.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, आम्ही एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो. माझी कार मागे होती आणि फडणवीसांची कार पुढे लागली होती. त्यामुळे आम्ही एकाच कारमध्ये प्रवास केला, असं स्पष्टीकरण दिले.

तसेच पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की, कोअर कमिटीत असल्याने भाजपाच्या बैठकीत उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा कार्यकारणी होत आहे. अनेक विषयांवर येथे चर्चा झाली. आगामी काळातील कार्यक्रम, युवा मोर्चा जास्तीत जास्त सक्रिय होत, तरुण वर्ग भाजपाकडे आकर्षित होण्यासाठी काय करावे? यावर चर्चा झाली. तसेच, सरकारचा अभिनंदन ठराव मांडण्यात आल्याची माहितीही पंकजा मुंडेंनी दिली.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *