Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगांवातून प्रचाराची सुरुवात केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणूकीतील भाजपाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत असून पक्षाच्या उमेदवारांसाठी ९ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  विशेष म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकिट न देता त्यांच्या मुलीला तेथून पक्षाच्यावतीने उमेदवारी दिली. नेमकी तेथून मोदींच्या प्रचार सभेला सुरुवात होणार असल्याने राज्यात वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न तर नाही ना असा सवाल कार्यकर्त्यांकड६ून उपस्थित केला जात आहे.
या पत्रकार परिषदेला भाजप राष्ट्रीय माध्यम विभाग सह प्रमुख संजय मयुख, प्रदेश मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष माधवीताई नाईक, प्रदेश सह मुख्य प्रवक्ते आणि माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र नोंदी यांची राज्यातील पहिली प्रचार सभा १३ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे होणार आहे. याच दिवशी पंतप्रधानांची साकोली ( जि. भंडारा ) येथेही सभा होणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अकोला, ऐरोली (नवी मुंबई) आणि परतूर, येथे तर १७ ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, परळी येथे सभा होणार आहेत. १८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील सभेने पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार दौऱ्याची सांगता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. स्मृती ईराणी यांनी सांगितले की, काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी साडे सात हजार कोटी एवढी नुकसान भरपाई मिळाली. फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना २१ हजार ९५० कोटी एवढी भरपाई पीक विम्यापोटी मिळाली. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना २५ हजार कोटींची कर्जमाफी दिली. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात दीड लाख कोटी एवढी गुंतवणूक करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत एकही दंगल झाली नाही, एकही दहशतवादी हल्ला झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मैदानाची परवानगी बच्चू कडू यांच्याकडे मात्र अमित शाह यांची सभा नवनीत राणांसाठी

सध्याच्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. या त्यातच अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *