Breaking News

नाणार प्रकल्प कोकणात नको, तर विदर्भात आणा भाजप आमदार आशिष देशमुख यांची मुख्यमंत्री, उद्योग मंत्री आणि उध्दव ठाकरेंकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी

कोकणातील नियोजित नाणार येथील रिफायनरी प्रकल्प सुरु करण्यास स्थानिक नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे वृत्त सातत्याने प्रसारमाध्मात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प कोकणऐवजी विदर्भातील कटोल येथे स्थलांतरीत करावी अशी मागणी भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मँग्नेटीक महाराष्ट्र या गुंतवणूक परिषदेतून विदर्भात गुंतवणूकीसाठी मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील अशी अपेक्षा होती. मात्र मोठ्या उद्योगांनी तसा रस दाखविला नाही. त्यामुळे नाणार येथील प्रकल्पाला होत असलेला विरोध पाहता हा प्रकल्प विदर्भात सुरु करावा अशी मागणी करत या प्रकल्पामुळे विदर्भातील नागरीकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच या भागाचा विकास होण्यास मदत होईल असे मतही त्यांनी त्या पत्रात मांडले आहे.

शिवाय या प्रकल्पासाठी लागणारी १५ हजार एकर जमिन उपलब्ध करून दिली जाईल असे सांगत याप्रकल्पामुळे पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर  या भागात एमआयडीसीने प्रकल्पासाठी जमिनही निश्चित केली आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासोबत नवी दिल्ली येथे चर्चा करण्यात आली असून हा प्रकल्प विदर्भात स्थलांतरीत करण्याची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

याशिवाय सर्वात म्हणजे नागपूर-मुंबई दरम्यान होणाऱ्या समृध्दी प्रकल्पामुळे नागपूर-मुंबई दरम्यान पेट्रोल-गँसची स्वतंत्र पाईपलाईन या मार्गीकेवर उभारणे शक्य होणार आहे. त्यामुळे रेल्वे भाड्याच्या पैशात मोठ्याप्रमाणावर बचत होईल. याशिवाय विदर्भाला लागून चार राज्य असल्याने दळणवळणाची सुविधाही सोयीची होणार असल्याची मत या पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

Check Also

मैदानाची परवानगी बच्चू कडू यांच्याकडे मात्र अमित शाह यांची सभा नवनीत राणांसाठी

सध्याच्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. या त्यातच अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *