Breaking News

सुप्रिया सुळे यांचा आरोप, धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाला भाजपाचा विरोध विद्यमान गृहमंत्री राज्याच्या इतिहासात सर्वाधिक अपयशी गृहमंत्री

मुंबईतील बस बेस्ट कामगारांच्या समस्या संदर्भात प्रतीक्षा नगर येथील बस डेपो मध्ये जाऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेणार आहेत असे सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस बारामतीत येऊन म्हणाले होते की, पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण देऊ. तेव्हा ते सीएम होते. नंतर डीसीएम झाले. आता ते डीएसीएम १ झाले. त्यानंतर आता पन्नास-दोनशे कॅबिनेट झाल्या, पण काही झालं नाही. दिल्लीतील भाजपाच्या लोकसभेच्या सदस्यांनी धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाला विरोध केला. यामुळे या विषयात भाजपा एक्स्पोज झाली, असा आरोपही केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्याच्या इतिहासात असे अपयशी मुख्यमंत्री आज पर्यंत झालेले नाही आहे. महिला सुरक्षिता, ड्रग्स, राज्यात वाढलेले गुन्हेगारीचे प्रमाण तथा जालना येथे मराठा समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनात गरीब महिला आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेला लाठी चार्ज या सर्व घटनांमुळे राज्यातील गृहमंत्री पूर्णपणे अपयशी झाल्याचे यावरून दिसून येत आहे अशी टीकाही केली.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, सर्वच गोष्टींवर राजकारण करण्याची गरज नाही. आपण राजकारण बाजूला ठेवून माणुसकी दाखवायला हवी. राज्य सरकारकडे माणुसकी नसली तरी अजूनही आमच्याकडे माणुसकी शिल्लक आहे. मुंबईने आतापर्यंत आपल्या सर्वांना खूप काही दिलं आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या पुणे जिल्हा हा खूप मोठा असून फक्त जेजुरी मध्ये कार्यक्रम घेऊन तुम्ही पुणे जिल्ह्याचे नाव घेऊ शकत नाही. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम चार वेळा रद्द करण्यात आला होता. त्यासाठी पंधरा ते वीस कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? याची उत्तर कोण देणार असा सवालही उपस्थित करत तेच १५ कोटी रुपये जर तुम्ही कामगार वर्गाला दिले असते तर सर्वांची दिवाळी साजरी झाली असती असेही म्हणाल्या.

या कामगारांना मुख्यमंत्र्यांकडून शब्द देण्यात आला असूनही पगार वाढ करण्यात आलेली नाही आणि दिवाळी बोनस देखील अद्याप देण्यात आलेला नाही. महागाई प्रचंड वाढली असताना या सामान्य कामगारांच्या हातात १२ ते १३ हजार रुपये पडतात. गरीब सामान्य माणूस महागाईमध्ये प्रचंड प्रमाणात भरडला जात आहे. याची जाणीव या सरकारला नाही आहे. असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

कामगारांना त्यांचा मोबदला न मिळाल्यास मी स्वतः आंदोलनाला बसणार आहेत.  बेस्टचे एक ऑडिट लवकरात लवकर करायला हवं. या सरकारकडे मेट्रो सारख्या प्रकल्पांसाठी कोरोड रुपये आहेत. मात्र सामान्य कामगारांना देण्यासाठी पैसे नाहीत. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. ज्या बाळासाहेबांनी मुंबईत बसून दिल्ली हलवली आज त्यांचं नाव वापरणारे लहान लहान गोष्टींसाठी दिल्लीत पळत आहेत अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *