Breaking News

हेमांगी कवीने जाहीरपणे मागितली माफी; नेमकं प्रकरण काय ? सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेली हेमांगी कवी म्हणते की....

हेमांगी कवी आपल्या रोखठोक भूमिकेमुळे आणि स्पष्ट विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. हेमांगी कवी समाज असो वा कलाविश्व कुठेही काही अनुचित प्रकार घडला की हेमांगी त्यावर बेधडकपणे तिचं मत मांडते.त्यामुळे बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. परंतु, या ट्रोलर्सला ती सडेतोड उत्तर देते. मात्र, कायम इतकांना खडे बोल सुनावणाऱ्या हेमांगीने यावेळी चक्क सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांची माफी मागितली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या हेमांगीने अलिकडेच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांची माफी मागितली आहे. विशेष म्हणजे तिची ही पोस्ट पाहिल्यावर हेमांगीने नेमकी माफी का मागितली हा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु, तिच्या माफी मागण्यामागेही खास कारण आहे.

बऱ्याचदा असं होतं की काही माणसं चॅट ओपन करतात आणि त्यावर रिप्लाय द्यायला विसरतात. हेमांगीच्या बाबतीतही असंच होतं. त्यामुळे तिने याबद्दल सगळ्यांची माफी मागितली आहे. ‘मला माफ करा मी सुद्धा त्यापैकीच एक आहे’, असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. हेमांगी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे आज मराठी कलाविश्वात तिचा दरारा असल्याचं पाहायला मिळतो.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

भल्या पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या महानगरपालिकेला सूचना

शहरात काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *