Breaking News

हळद चेहऱ्याला लावत असाल थांबा आरोग्यदायी हळदीबाबतची बातमी वाचा

हळद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तसेच बहुतेक लोक आपली त्वचा निरोगी राहण्यासाठी हळदीचा वापर करतात. मग चेहऱ्यावरील टॅनिंग, पिंपल्स अशा समस्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक हळदीचा वापर करत असतात. पण हळदीचा वापर करूनही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर हळदीमध्ये कर्क्युमिन हा घटक आढळतो जो बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतो. तसेच हा घटक विषाणूविरोधी मानला जातो.

जर चेहऱ्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करत असाल तर तुमची समस्या कमी होण्याऐवजी ती समस्या वाढू शकते. कारण बहुतेक लोकांच्या चेहऱ्याला हळदी सूट होत नाही. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर डाग येऊ शकतात किंवा चेहऱ्यावर जळजळ निर्माण होऊ शकते. कारण हळदीमध्ये एक एलर्जी असते जी संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना हानी पोहोचवू शकते.

तसेच हळद लावल्यानंतर काही लोकांच्या चेहऱ्याला खाज सुटते किंवा जळजळ जाणवते. त्यामुळे सेन्सिटिव्ह स्किन असलेल्या लोकांनी हळदीचा वापर करणे टाळावं. चेहऱ्यावर हळदी लावण्याचे अनेक नुकसान देखील आहेत. यामध्ये जर तुम्ही चेहऱ्याला हळद लावली तर तुमच्या चेहऱ्यावर कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस होऊ शकतो. यामध्ये मग हळद लावल्यानंतर तुमच्या त्वचेला खाज सुटते किंवा डाग पडू शकतात.

जर तुम्हाला हळदी पासून होणारे नुकसान टाळायचे असेल तर हळदीचा योग्य वापर कसा करायचा याबाबत जाणून घ्या. यासाठी चेहऱ्यावर कधीही हळदी तशीच लावू नका. जर चेहऱ्यावर तुम्ही हळदीचा वापर करणार असाल तर बेसन आणि हळदी मिक्स करून लावा किंवा बेसन कोरफड आणि दूध यामध्ये हळद मिसळून तुम्ही त्याचा फेस पॅक चेहऱ्यावरती लावू शकता

Check Also

आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आंदोलन मागे

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी व अधिका-यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *