भ्रष्टाचार महाराष्ट्राला लागलेली कीड असून ‘तुम्ही जागृत राहा, भ्रष्टाचार करु नका आणि होऊही देऊ नका…’ असं म्हणत अभिनेत्याने सर्वत्र होत असलेल्या भ्रष्टाचाराचा विरोध केलं आहे. इंडियन बँकेच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनमध्ये सैराट फेम मराठी अभिनेता आकाश ठोसर सहभागी झाला होता. वॉकेथॉनमध्ये आकाश याने भ्रष्टाचारविरोधात मोठं विधान केलं आहे. ‘इंडियन बँकेचे आभार की ते भ्रष्टाचारविरोधात बोलत आहेत. अशाच छोट्या-छोट्या पावलांनी सुरुवात होते. यावर आपण बोललं पाहिजे. तुम्ही जागृत राहा, भ्रष्टाचार करु नका आणि होऊही देऊ नका…’
पुढे अभिनेत्याने त्याच्या आगामी सिनेमाबद्दल देखील मोठी माहिती दिली आहे. ‘बाल शिवाजी नावाचा माझा नवा सिनेमा येत आहे. महाराजांच्या मोठेपणीच्या लढाया आपण ऐकल्या-वाचल्या आहेत. पण १४-१५ वर्षांच्या शिवरायांचं आयुष्य आम्ही या सिनेमात दाखवतोय. शिवरायांवरचे अनेक सिनेमे आले असतील, पण शिवरायांच्या आयुष्यातील हा टप्पा दाखवलेला नाही, म्हणून मी देखील खूप उत्सुक आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला.
आकाश सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याची चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आकाश याच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतो. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आकाश कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो तसेच त्याचे चाहते त्याच्या फोटोवर कॉमेंट करत असतात.