Breaking News

मुकेश अंबानी धमकी प्रकरणात या राज्यातून आरोपीला अटक

मुकेश अंबानी यांना सहा वेगवेगळे धमकीचे मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळत नावात अशातच आता या प्रकरणात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. यापैकी एक जण गुजरातचा आहे आणि दुसरा तेलंगणाचा आहे. हे प्रकरण दोन्ही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणाने केल्याचे दिसते, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दावा केला आहे की, गुजरातमधील राजवीर खंत जो मुख्य आरोपी आहे, त्याने २७ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर या कालावधीत व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरून [email protected] या ईमेल आयडीवरून मुकेश अंबानी यांना पाच मेल पाठवले. खंत यांने सुरुवातीला २० कोटी रुपयांची मागणी केली आणि नंतर उद्योगपतीने त्याच्या मेलला प्रतिसाद न दिल्याने मागणी वाढवून ४०० कोटी रुपये केली.

तसेच अन्य विद्यार्थ्याची ओळख तेलंगणातील गणेश आर वनपारधी असे आहे, ज्याने मीडियामधील धमकीच्या मेलचे वृत्त वाचून एक मेल पाठवला. या प्रकरणातील सहावा धमकीचा मेल त्याच्या ईमेल आयडीवरून आल्याचे पोलिसांनी सांगितले. याने धमकीचा मेल करत ५०० कोटींची मागणी केली. वनपारधीला कोर्टात हजर केले असता त्याला ०८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Check Also

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंतचे आर्थिक सहकार्य

वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांनात पालकमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *