Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभरः पण दिवा येथे कधी ?

मागील काही महिन्यांपासून राज्यातील वाढते प्रदुषण आणि शहरातील घाणीच्या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत मुंबईतील अनेक भागात सकाळपासून प्रदुषण रोखण्यासाठी आणि स्वच्छ मुंबईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र ठाणे शहराचा भाग असलेल्या दिवा शहरात मुख्यमंत्री शिंदे हे कधी स्वच्छता मोहीम राबविणार असा सवाल दिवा येथील रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

ठाणे शहराच्या हद्दीत कळवा-मुंब्रा आणि दिवा या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या तिन्ही ठिकाणी ना सांड पाण्याची सोय ना पिण्याचे पाणी स्वच्छ मिळेण्याची सोय आहे. दिवा शहराच्या पूर्व पश्चिम भागात विशेषतः रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर (अनधिकृत) इमारतींचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. त्यामुळे येथील कोणत्या बाजूच्या भागात गेले तर मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आणि दुर्घंधीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. त्यामुळे येथील घरांच्या किंमती जरी ठाणे शहर आणि कल्याण शहराच्या तुलनेत स्वस्त असल्या तरी पुरेशा नागरी सुविधांची मात्र बोंबाबोब असल्याचे दिसून येते.

या तिन्ही ठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर असून त्यांचे समर्थक नगरसेवकांच्याच हाती येथील जनतेचा कारभार आहे. त्यामुळे दिवा, कळवा आणि मुंब्रा परिसरातील घाणीचे साम्राज्य मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वच्छता मोहिमेत लवकरच येईल अशी अपेक्षाही दिवा वासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार राज पुरोहित, उद्योगपती नादीर गोदरेज, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

महास्वच्छता अभियान राज्यभर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवले. या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे. त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानासाठी एक कार्य प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात यावे.

स्वच्छता अभियान लोकचळवळ झाली

मुंबई शहरात सुरू केलेल्या या अभियानात शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध प्रतिष्ठान सहभागी होत आहेत. यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येत आहे. मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झाले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज येथे सांगितले.

मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविणार

विकास प्रकल्पामुळे तोडाव्या लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. मुंबईत रिकाम्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत. मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्यासाठी विचार सुरू आहे. ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुख पर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवा, लोकप्रतिनिधींना सूचना

मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र नेले जाणार आहे. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध लोकप्रतिनिधींना केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे आमदार विद्या ठाकूर, आशिष शेलार, यामिनी जाधव, भारती लव्हेकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर,

दिलीप लांडे, कालिदास कोळंबकर यांच्याशी संवाद साधला.

तत्पूर्वी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मुंबई शहरात राबवल्या जात असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हबाबत माहिती दिली. यावेळी स्वच्छता कर्मचारी संदीप पवार, शीला जाधव, मच्छिंद्र सावंत, स्वप्नील शिरवाळे, अर्चना मोरे यांचा सत्कार करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आभार मानले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. स्वच्छता कामात उपयोगी ठरणाऱ्या वाहनांच्या संचलनास हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, सदानंद धवन उद्यान, भोईवाडा येथे भेट देऊन सफाई कर्मचारी व मुलांशी संवाद साधला.

Check Also

महापारेषणच्या पडघे-कळवा उपकेंद्रात भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० के. व्ही. अति उच्च दाब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *