Breaking News

आजपासून UPI वापराचे बदलले नियमः जाणून घ्या कोणते बदल केले

२०१४ सालापासून ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणाऱ्या व्यक्तींच्या फोनवर सायबर हल्ला करत ऑनलाईन बँकिंगमधून सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांची मोठ्याप्रमाणावर आर्थिक लूट करण्यात येत असल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत होती. तसेच सायबर हल्ल्याद्वारे आर्थिक लूटीवर पायबंद घालणेही पोलिस प्रशासनला अवघड बनत चालले होते. यापार्श्वभूमीवर ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार करणाऱ्यांसाठी UPI चा वापर करणाऱ्यांसाठी नियमांमध्ये बदल लागू केला असून हे नियम आजपासून लागू करण्यात येत आहेत.

आजपासून UPI वापराच्या नियमांमध्ये हे बदल करण्यात आले ते खालीलप्रमाणे

१) नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने दिलेल्या आदेशानुसार ऑनलाईन बँकिंग वापरासाठी UPI किंवा Phone Pay, Google Pay हे अॅप वापरणाऱ्यांचे आयडी तपासण्याचे आदेश दिले आहे. एखाद्या व्यक्तीने हे अॅप वापरण्यासाठी युझर आयडी निर्माण केलेला असेल पण त्याचा मागील एक वर्षापासून तो आयडी वापरण्यात येणार नसेल. संबधित खात्याला जोडण्यात आलेला फोन नंबरची सेवा चालू आहे की बंद आहे तपासून पहावे असे निर्देश दिले आहेत. तसेच ज्यांची सेवा सुरु आहे त्यांची सेवा तशीच सुरू ठेवावी आणि ज्यांनी अॅपचा युझर आयडी निर्माण केलेला आहे. मात्र त्यांच्याकडून त्याचा वापरच करण्यात येत नसेल त्याचे युझर आयडी सुरु ठेवण्याबाबत निर्णय संबधित ऑनलाईन बँकिंग अॅपने घ्यायवयाचा आहे.

२) तसेच एनपीसीआयने आणखी पुढे असे जाहिर केले आहे की, आगामी काळात UPI चे दुसरे सर्वाधिक मार्केट असणार आहे. त्यामुळे हे संपूर्ण मार्केट बेटा फेझ मध्ये लवकरच लाँच करण्यात येणार आहे. त्यासाठी स्टेक होल्डर्स आणि काही ग्राहकांना सोबत घेऊन काही प्रयोग करण्यात येणार आहेत. या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणाऱ्यांना आर्थिक फंड कसा ब्लॉक करावा, तसेच मार्केटमध्ये खर्ची घातलेला फंडमध्ये सेटलमेंट कशी करावी, तसेच कोणत्याही प्रक्रियेशिवाय क्लिअरिंग कार्पोरेशन टी १च्या आधारावर करण्याचे शिकविणयात येणार आहे.

३) त्याचबरोबर UPI बँकिंग व्यवहारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही प्रमाणात निर्बंधही जारी केले आहे. यामध्ये शैक्षणिक आणि रूग्णालयाच्या बिलासाठी १ ते ५ लाख रूपयांपर्यंतचे आर्थिक व्यवहार UPI वरून करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मॉनेटरी धोरणासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

४) तसेच आगामी काळात रिझर्व्ह बँकेकडून UPI ATM देशभरात सुरु करण्याचा निर्णय ही घेण्यात आलेला आहे. त्यासाठी फक्त क्यु आर कोड स्कॅन करून ग्राहकाला त्याच्या खात्यावरील शिल्लक रक्कम काढता किंवा खर्च करता येणार आहे. त्यासाठी हिताची पेमेंट सर्व्हिस कंपनीकडून यापूर्वीच अशा पध्दतीची UPI ATM ची क्यु आर कोडचा वापर असलेल्या सेवा सुरु केल्या आहेत.

५) याशिवाय रिझर्व्ह बँकेने २ हजारापेक्षा जास्तची देयके ऑनलाईन पध्दतीने देण्यासाठी ४ तासाचा कालावधी दिला आहे. त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहार करण्याच्या पध्दतीत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु हे करताना सुरक्षेचे मापदंड असायला हवेत असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

या पाच नियमात बदल करण्यात करत ऑनलाईन व्यवहारासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केले आहेत.

Check Also

इंडिगो, जगातील तिसऱ्या क्रमांकांची विमान कंपनी बनली भारतातील सर्वात मोठी एअरलाइन

इंडिगो विमान कंपनीने बुधवारी बाजार भांडवलाच्या बाबतीत यूएस-आधारित साउथवेस्ट एअरलाइन्सला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *