Breaking News

निवडणूक आयोगाचे सरकारला आदेशः बदल्या ३१ जानेवारीपर्यंतच करा

पाच राज्यातील निवडणूकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपाने घवघवीत यश मिळविल्यानंतर आता लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा विजय मिळविण्याच्या अनुषंगाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच महाराष्ट्रात विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील अंसंतोषाचा फटका लोकसभेसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत बसायला नको म्हणून राज्यात मध्यावधी निवडणूका घेण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य आणि केंद्र सरकारला पत्र पाठवित प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या अथवा शिफारसी बदल्या ३१ जानेवारी २०२४ पूर्वी कराव्यात असे आदेश पत्र पाठवित दिले आहेत.

राज्यात किंवा केंद्रात लोकसभा किंवा विधानसभा निवडणूकांचा कालावधी नसताना नियोजित बदल्या मार्च-एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यात येतात. मात्र यंदा २०२४ सालच्या लोकसभा निवडणूका मार्च-एप्रिल मध्ये होत असल्याने नियमित बदल्या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूकीच्या कालावधीत बदल्या करता येत नाहीत. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या एका महिन्यातच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी असे स्पष्ट आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने सरकारला पाठविलेल्या पत्रात लिहिले आहे.

त्याचबरोबर उर्वरित अधिकाऱ्यांच्या बदल्या या निवडणूकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मे-जून महिन्यात पूर्ण कराव्यात असेही केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठविलेल्या पत्रामुळे राज्य सरकारच्या प्रशासनातील अप्पर मुख्य जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी विद्यमान सरकारमधील गुच्छ स्विकारणाऱ्या मंत्री आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. तसेच गुच्छ देऊ पाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनही सध्या मंत्रालयाच्या वाऱ्या सुरु करण्यास सुरुवात केली असल्याचे खात्रीलायक माहिती पुढे आली आहे.

बदल्यांसंदर्भात निवडणूक आयोगाने लिहिलेले हेच ते पत्र

 

Check Also

अमित शाह यांचे आवाहन, … राहुल गांधी यांना सत्तेपासून दूर ठेवा

गेल्या दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आलेख असलेल्या भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *