Breaking News

आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात दुचाकी स्वाराचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा जोडीदार गंभीर जखमी झाला आहे. सांगोला तालुक्यातील माळवाड-नाझरे दरम्यान गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

अशोक नाना वाघामारे (वय ५०, रा. माडगुळे, ता. आटपाडी, जि.सांगली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याच्या सोबत दुचाकीवर पाठुमागे बसलेला नाना आमोणे (रा. एकतपूर, ता. सांगोला) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणाऱ्या सांगोला ग्रामीण रूग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

आमदार ॲड. शहाजीबापू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त नाझरे येथे आयोजित आरोग्य शिबिरास भेट देण्यासाठी गेले होते. तेथून सांगोल्याकडे परत येत असताना नाझरे गावच्या पुढे काही अंतरावर त्यांच्या मोटारीपुढे संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या स्कार्पिओ गाडीवर समोरून विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने आदळला. आमदार पाटील यांच्या ताफ्यातील कोणालाही इजा झाली नाही.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *