Breaking News

आदित्य ठाकरे म्हणाले, गुन्हा होऊच शकत नाही…मी तेथील आमदार

दक्षिण मुंबईतील डिलाईल रोड पूलाची एक लेन पूर्णपणे तयार असताना मागील १० दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता. डिलाईल पूल रस्ता नव्याने तयार करूनही मुंबई महापालिकेने बंद ठेवला होता. त्यावर वरळीचे आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी इतर नेत्यांसोबत जाऊन पुलावर रहिदारी बंदसाठी लावण्यात आलेले बॅरिक़ेड्स हटवून पुलाचे उद्घाटन केले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बीएमसीच्या तक्रारीवरुन याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून आणि अतिक्रमण केल्याचा आरोप ठेवत रात्रीत गुन्हा दाखल केला. त्यावर आपली भूमिका मांडण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषदत घेतली.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, मागील १० दिवसांपासून डिलाईल रोड पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरही तो तेथील रहिवाशांसाठी खुला करण्यात आला नव्हता. घटनाबाह्य सरकारकडून तो अती महत्वपूर्ण व्यक्तीच्या हातून तो जनतेला खुला करायचा होता. परंतु रात्री मी माझ्या सहकाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांसाठी तो खुला करत तो पूल खुला केला. पण पोलिसांनी याबद्दल माझ्यासह सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेचे प्रशासन यापूर्वी सांगत होते, पूलाचे काम सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. आता पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्धाटन पण अती महत्वाच्या व्यक्तीकडून करण्यात येणार असल्याने आणि उद्घाटनासाठी त्या व्यक्तीची वेळ मिळत नसल्याने अद्याप कामे अपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मुंबई महापालिका म्हणते की आता ५ टक्के काम बाकी राहिले आहे. अशी कारणे सरकारकडून सांगण्यात येतात. वास्तविक पाहता, आमच्या सारख्यांवर गुन्हे दाखल होतात. पण वेळेत काम पूर्ण केले नाही म्हणून बिल्डर आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल होतात का असा सवाल केला.

तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, माझ्यावर अतिक्रमण सारखे वगैरे गुन्हे दाखल आमच्यावर होण्याआधी जे पालकमंत्री आहेत. त्यांनी बीएमसीवर अतिक्रमण करत कार्यालय थाटून बसले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी करत ज्या पध्दतीने नवी मुंबई मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्यांना अती महत्वाच्या व्यक्तीची वेळ मिळत नाही म्हणून पाच महिने उद्घाटनच रोखून ठेवले. अखेर वेळ मिळतच नाही म्हणून उद्घाटनाशिवायच नवी मुंबई मेट्रो सुरु करण्यात आल्याचेही स्पष्ट केले.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात बसलेले सरकार हे नागरिकांसाठी नाही तर कंत्राटदार आणि बिल्डरांचे सरकार असल्याचा आरोप करत अद्याप पर्यंत सॅनिटरी पॅडची जी २३ हजाराला मिळणारी मशिन अद्याप त्यांनी कोठेही लावली नाही. त्यांना ती ७६ हजारांना खरेदी केली आहे. त्या साठी त्यांच्याकडून थांबविली गेली. तसेच ज्या पुलाचे काम बिल्डरला दिले. त्या बिल्डरकडून अद्याप काम पूर्ण झाले नसल्याचे सांगत आणखी त्याला २४ कोटी रूपये द्यायचे आहेत. असे हे राज्यातील घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे हे सरकार जनतेचे नव्हे तर बिल्डर, कंत्राटदारांचे सरकार असल्याचा आरोप केला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मी मुंबईकरांच्या हक्कासाठी लढत असतानाही बिल्डर, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याऐवजी आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वास्तविक पाहता अशा पध्दतीची माझ्या विरोधात गुन्हा दाखल होऊच शकत नाही. कारण मी त्या भागातील आमदार आहे. तो पूल माझ्या मतदारसंघात येतो. त्यामुळे त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून कामाची पाहणी करू शकत नाही का असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांना केला.

त्र्यांनी जनतेची कामे करावीत असा खोचक सल्ला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना देत त्यानंतर आमचे सरकार येणार आहे. आमचं सरकार असताना भ्रष्टाचार करणाऱ्याला आणि पाठीशी घालणाऱ्याला आत टाकू असा इशारा दिला.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *