Breaking News

खुषखबर : उद्यापासून महाराष्ट्रातील रेल्वे बुकिंग आणि प्रवास सुरु राज्य सरकारच्या missionbeginagain च्या मार्गदर्शक तत्वानंतर रेल्वेची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

नुकतेच राज्य सरकारने राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी असलेली ई-पासची अट काढून टाकल्यानंतर महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी रेल्वेनेही परवानगी देत उद्यापासून बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे अनेकजणांना कामानिमित्त बाहेरगावी आणि इतर ठिकाणी जाता येत नव्हते. मात्र रेल्वेच्या निर्णयामुळे आता राज्यातल्या राज्यात आणि राज्यांतर्गंत प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने काल प्रसिध्दी पत्रक जारी करत राज्यातल्या राज्यात प्रवास करता येणार असल्याचे जाहीर केले. तसेच यासंदर्भातील बुकिंगही करता येणार असून प्रवासासाठीची बुकिंग उद्यापासून करता येणार असल्याचे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, गडचिरोलीला जाता येणार आहे. तर त्या भागातून मुंबईला येता येणार आहे.

 

Check Also

करदात्यांना दिलासा: आयकर भरण्याची मुदत वाढविली आयकर विभागाकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती

मुंबई: प्रतिनिधी देशातील आयकरदात्यांना ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत आपला कर भरण्याची वाढीव मुदत देण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *