मुंबईः विशेष प्रतिनिधी
जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील हल्यानिषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात फ्रि काश्मीरचा फलक फडाकाविल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फुटीरतावाद्यांचे आंदोलन अशी टीका केली. त्यास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिल्यानंतर पाटील, हे सरकारचे फुटीरतावादी मानसिकतेचे वकील खोचक
टीका सरकारच्या खुलाशावर टीका केली.
जेएनयु हल्याच्या विरोधात मुंबईतील विद्यार्थी आणि पुरोगामी विचाराच्या नागरीकांनी कुलाब्यातील गेट वे ऑफ इंडिया येथे निदर्शने केली. त्यावेळी काश्मीरमधील इंचरनेट सेवा, एसएमएस सेवा ठप्प करण्यात आल्याच्या निषेधार्थ एका विद्यार्थीनीने फ्रि काश्मीर लिहीलेलाफलक फडकाविला. मात्र या फलकाचा भलताच अर्थ काढत या आंदोलनावर फवुटीरतावाद्यांचे आंदोलन अशी टीका करण्यास भाजपाने सुरुवात केली.
तसेच ट्वीटच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यालयापासून केवळ २ किलोमीटरच्या अंतरावर अशी निदर्शने होत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त करत काश्मीर स्वतंत्रतेचा मुद्दा मांडणाऱ्या फुटीरतावाद्यांना पाठिशी घालणार का असा सवाल केला.
फडणवीस यांच्या ट्वीटला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तितक्याच तडफेने उत्तर देत फडणवीसजी फ्रि काश्मीरमध्ये जो भेदभाव कऱण्यात येत आहे, त्याबाबत तो फलक आहे. परंतु तुमच्या सारख्या जबाबदार नेत्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे सांगत शब्दांचा छळ तुमच्याकडून अपेक्षित नव्हता अशी मल्लिनाथी केली.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा प्रतित्तुर देत सरकार काय हे दुर्दैव असे म्हणत फुटीरतावादी मानसिकता सरकारच्या वकीलांची झालीय असा सरळ आरोप जयंत पाटील यांच्यावर त्यांनी करत सत्तेत असा किंवा विरोधात देश सर्वप्रथम असा सल्लाही दिला.
