Breaking News

महेश मांजरेकर घेणार ऑनलाईन ऑडिशन वर्क फ्रॉम होमचा असाही फायदा

मुंबईः प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने आवाहन केल्याप्रमाणे मराठी चित्रपट उद्योगाने आपल्या चित्रपटाचे सर्व काम बंद केले. तसेच सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्क फ्रॉम होमही करत आहेत. मात्र या संधीचे सोने करण्याची योजना प्रसिध्द चित्रपट निर्माता आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी आखली असून आपल्या आगामी चित्रपटासाठी लागणाऱ्या नवोदीत कलाकारांना ऑनलाईन ऑडीशन पाठविण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या ट्विटरच्या माध्यमातून मांजरेकर यांनी हे आवाहन केले असून नवोदीत कलाकारांना यानिमित्ताने चांगली संधी चालून आली आहे.

नमस्कार,
मी महेश मांजरेकर… सध्या कोरोनामुळे शूटिंग्ज बंद आहेत. नाटकांचे प्रयोग थांबलेले आहेत. मीसुद्धा घरी बसूनच पुढील सिनेमाचं लिखाण करतोय. एकूण सगळीकडेच वर्क फ्राॅम होम सुरु आहे. काही मित्रांशी बोलत असताना असं लक्षात आलं की घरी बसून करायचं काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. कदाचित तुम्हालाही पडला असेल. म्हणून मग एक विचार आला तुम्हाला एक ॲक्टीव्हीटी द्यावी.
बऱ्याच काळापासून मी ऐकतोय की माझ्या किंवा माझ्या कंपनीच्या नावाने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी auditions सुरु असतात. त्यावर काहीतरी इलाज करायचा असं बरेच दिवस डोक्यात होतं. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी कधीही अशा auditions घेत नाही. पण आता पहिल्यांदा मी Online Audition चं आवाहन करतोय. तुम्ही कोणत्याही वयातले असाल, तुम्हाला अभिनयाची आवड असेल, तुमचं अभिनयाचं शिक्षण झालं असेल तर तुम्हाला आवडतील ते डायलाॅग्ज, आवडेल तो परफाॅर्मन्स आम्हाला मोबाईलवर शूट करुन पाठवा, सोबत तुमची माहिती, तुमचे फोटो, संपर्क क्रमांकही पाठवा. यासाठी ई-मेल आयडी आहे – [email protected] माझी टीम (जी सध्या घरीच बसलेली आहे) ते या माहितीचं संकलन करतील. तुमचं नाव आमच्याकडे रजिस्टर केलं जाईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.

आपला,
महेश मांजरेकर ??

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *