Breaking News

आरोग्य मंत्री म्हणाले, कोरोनाच्या ३ टप्प्यात जायचे नाही अन्यथा कठोर निर्णय राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात

मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागरिकांनी गर्दी टाळावी. आत्ता कोरोना संसर्ग दुसऱ्या टप्प्यात आहे, तो तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये यासाठी उपाय योजना आखण्यात येत आहेत. मात्र नागरीकांनी गर्दी करणे टाळले नाही तर प्रसंगी कठोर निर्णय घेतले जातील असे सांगत रेल्वे, बससेवा बंद करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
मुंबईत विलगीकरण कक्षाची सुविधा वाढवण्याचे काम सुरू असून खासगी रुग्णालयातही क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचे आणखी ३ नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर पोहोचली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी १ नवीन रुग्ण आढळून आला आहे. या ३ नवीन रुग्णांमुळे राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ५२ वर गेली आहे. राज्यातील १ हजार ३६ जणांना त्यांच्या ट्रॅवल हिस्ट्रीनुसार निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यातील ९७१ जणांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काल आणखी ५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना आज (शुक्रवार) डिस्चार्ज मिळणार आहे. मात्र, पुढील १४ दिवस ते निरीक्षणाखाली राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचा अर्थ कोरोनाचे रुग्ण बरे होतात, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. या सर्व रुग्णांचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून केला जाणार असून ६ लॅबमध्ये टेस्ट करत आहोत. मात्र येणाऱ्या दिवसात लॅबची संख्या १२ वर पोहोचणार असल्याचे ते म्हणाले.
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी राज्यातील डॉक्टर्स हे त्यांचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. रत्नागिरीमधील डॉक्टरांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. तरीही हे डॉक्टर्स न घाबरता रिस्क घेऊन मानवतेचे काम करत आहेत. त्यांना सुरक्षेचे सर्व साधन उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *