Breaking News

मुख्यमंत्र्याकडून विरोधी पक्षनेते फडणवीसांना प्रतित्तुर : हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून शेवटचे निवेदन करताना सव्याज परत

मुंबई: प्रतिनिधी

विधानसभा कामकाजाच्या समारोपाच्यावेळी राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियांनाची माहिती देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी केलेल्या टीकेचे प्रतित्तुर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देत फडणवीसांच्या टीकेची परतफेड केली.

दुपारच्या सत्रात कोरोना आणि मेट्रो कारशेडसह इतर प्रश्नावरील चर्चेच्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून सर्वच प्रश्न प्रतिष्ठेचे करायचे नसतात असे सांगत उपरोधिक सल्ला दिला होता. तो धागा पकडत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, मुंबईसाठी पर्यावरणीयदृष्टीने काम करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. तसेच कामं करताना कोणताही इगो (गर्व ) नसावा किंवा शॉर्टकट नसावा असे सांगत तो असेल तर मग रात्रीच्या अंधारात कामे करावी लागतात किंवा पहाटेच्या अधांरात करावी लागतात असा पलटवार करत फडणवीसांच्या उपरोधिक टोल्याला तितक्याच जोरदारपणे प्रतित्तुर दिले. तसेच या वक्तव्याच्या पुष्टीसाठी अजित पवार यांच्याकडेही मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली. त्यावर अजित पवार यांनी होय असे म्हणण्याशिवाय दुसरे उत्तर दिले नाही.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ सप्टेंबर २०२० पासून ते १० ऑक्टोंबर दरम्यान माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राबविणार असल्याचे सांगत या अभियाना दरम्यान दोन स्वयंसेवकांचे पथक त्यात एक शासकिय कर्मचारी असे मिळून प्रत्येक घरी जाईल आणि त्या घरात कोणी आजारी आहे का? कोणी लठ्ठ आहे का? कोणता आजार आहे का? याची चौकशी करणार आहे. हे अभियान प्रत्येक वाडी-वस्तीपासून ते शहरातील प्रत्येक घरापर्यंत राबविण्यात येणार आहे. तसेच याची जबाबदारी सरपंच आणि स्थानिक नगरसेवकावर सोपविणार असल्याचे ते म्हणाले.

तर या अभियानाचा दुसरा टप्पा १२ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात आवश्यकता पडली तर त्या त्या कुटुंबियांची आजार असल्यास तपासणी करण्यात येणार आहे. तर या अभियाना सत्ताधारी पक्षातील सर्व आमदारांबरोबरच आपणही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.

तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष वेधत म्हणाले की, आरोग्य संघटनेने इशारा दिला कि आगामी काळात आणखी मोठ्या महामारीचा सामना करावा लागणार असल्याने त्यादृष्टीने तयार रहा म्हणून. त्यादृष्टीने आपल्याला आता तयारी करायची आहे. त्याचबरोबर हात धुणे, मास्क वापरणे आदी गोष्टींबाबत जनतेमध्ये जनजागृती करायची असून यासाठीही तुमचे सहकार्य हवे असून यात लोकांचा सहभाग वाढवायचा आहे. आगामी काळात या माध्यमातून देशात महाराष्ट्राचा आदर्श निर्माण करायचा असून कोरोनामुक्त महाराष्ट्र करायचा असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर पुढी अधिवेशन ७ डिसेंबर २०२० रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली. 

Check Also

सहा हजार ग्रामपंचायतींत भाजपाला बहुमत मिळेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *